Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

PMP : रक्षाबंधनानिमित्त सोडण्यात आलेल्या जादा बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नियोजित १८३७ शेड्युल व्यतिरिक्त ९६ जादा बसेसचे नियोजन करून सदर बसेस गर्दीच्या मार्गांवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पीएमपीएमएल च्या बससेवेला दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजीची प्रवाशी संख्या व प्राप्त उत्पन्न खालीलप्रमाणे
अ.क्र. दिनांक   मार्गावरील बससंख्या    प्रवाशी संख्या          प्राप्त उत्पन्न (रुपयात)
१ ३०/०८/२०२३     १९३०                  १३,७३,८१९                   १,९५,२७,३८४
२ ३१/०८/२०२३     १९०१                 १४,९६,२८२                    २,१६,४४,८५३

रक्षाबंधन सणानिमित्त विशेषतः महिला प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेतला. पीएमपीएमएल च्या बससेवेला असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading