श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट वतीने रक्तदान शिबिर
पुणे : श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने गणेशोत्सव काळात ढोल ताशा वादनाबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. त्याचाच एका भाग म्हणून यंदाच्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात तब्बल १६९ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.
नवीन मराठी शाळेच्या सभागृहात झालेल्या शिबिराला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, रोहित टिळक, नेत्ररोग तज्ञ डॉ.विजय कानडे, डॉ. आभा कानडे, कुणाल टिळक आदी उपस्थित होते. आमदार रवींद्र धंगेकर, नगरसेवक हेमंत रासने, जान्हवी बालन, राजाभाऊ कदम व इतर मान्यवरांनी शिबिराला भेट दिली.
शिबिराचे आयोजन श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेचे अध्यक्ष विलास शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याण रक्तकेंद्र, सुदर्शन शेटे आणि वेदांत कुंटे व सहकारी यांनी केले. शिबिर उद्घाटनाप्रसंगी डॉ. प्रसाद लावगनकर यांनी सूत्रसंचालन केले.