fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

अक्षरा अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह !

प्रेक्षकांची आवडती मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्यात अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात एक नवे आणि रोमांचक वळण येणार आहे. प्रेक्षकांनी झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वर प्रोमो बघितलंच असेल, येत्या ४ सप्टेंबरपासून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा विशेष सप्ताह प्रेक्षकांना पाहायला मिळेल.  शाळेत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अक्षराला अभिनंदन करतात व अगदी आनंदाने शुभेच्छा देतात. अक्षरा गोंधळून जाते. नंतर भुवनेश्वरी शाळेत येऊन अक्षराला ४ तारखेला तिचा आणि अधिपतीचा धुमधडाक्यात साखरपुडा होणार अशी घोषणा करते, अक्षरा हे सगळं बघून थक्क होते. आता या साखरपुडा विशेष सप्ताह भागांमध्ये काय धमाल घडणार. काय असणार भुवनेश्वरीचा नवीन डाव? यासाठी पाहायला विसरू नका “तुला शिकवीन चांगलाच धडा”साखरपुडा विशेष भाग ४ सप्टेंबरपासून पासून  रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

 

Leave a Reply

%d