fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

 ‘उबर’ने गेल्या १० वर्षांत बदलली भारतातील प्रवासाची संकल्पना

नवी दिल्ली : आजपासून दहा वर्षांपूर्वीभारतातील एका प्रवाशाने बंगळुरूतील रस्त्यावर उबरचे पहिल्यांदा स्वागत केले आणि उबरने प्रवास केला. तेव्हापासून उबरचे अॅप हे प्रवासी व चालक या दोघांसाठी देशातील सर्वात प्राधान्याचे व पसंतीचे प्लॅटफॉर्म बनले. उबरने भारतातील प्रवासाच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. या अॅपच्या माध्यमातून भारतातील १२५ शहरांमध्ये कारऑटोमोटो किंवा बस यांसारखी वाहने सुरक्षितविश्वासार्ह व परवडणाऱ्या स्वरुपात आता उपलब्ध झाली आहेत.

हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी, ‘उबर’च्या भारतातील कामगिरीविषयी थोडक्यातः

भारतात गेल्या १० वर्षात..

 ५०,००० कोटींहून अधिक – २०१३ पासून आजपर्यंत उबर प्लॅटफॉर्मद्वारे चालकांनी कमावलेली रक्कम.

 ३,३०० कोटी किलोमीटर – उबर चालकांनी किती गाडी चालवली आहेयाचा हा आकडा. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत सुमारे ८६००० वेळा प्रवास करण्याइतका!

 ३०० कोटी – भारतात उबरने केलेल्या एकूण राइड्सची संख्या

 ३० लाख – चालक भागीदार म्हणून उबर अॅपद्वारे उत्पन्न मिळविलेल्या चालकांची एकूण संख्या. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम ३० पटींनी भरण्याइतका हा आकडा!

 ४ कोटी किलोमीटर – २०४० पर्यंत शून्य-उत्सर्जन प्लॅटफॉर्म बनण्याची कटिबद्धता पूर्ण केल्यामुळे भारतात उबरने चालवलेल्या हरीत किलोमीटर्सची ही संख्या!

 

प्रवासी सुविधेच्या माध्यमातून संधी निर्माण करणे हे ‘उबर’चे ध्येय आहे. या दशकभरामध्ये उबरने भारतीय ग्राहकांना मनाजोगता प्रवास करण्यास सक्षम बनविले आहेच, त्याशिवाय प्रवास करण्याच्या पद्धतींमधील अकार्यक्षमता दूर करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कमाई करणाऱ्यांनाही सशक्त बनवले आहे आणि त्यातून अधिक मूल्य निर्माण केले आहे. डिजिटायझेशन आणि भारतातील वाढ यांवर लक्ष केंद्रित करून, ‘उबर’ने लाखो लोकांसाठीची प्रवासाची व्याख्याच बदलून टाकली आहे.

‘उबर’च्या या दहा वर्षांच्या कामगिरीविषयी बोलताना ‘उबर’चे भारत व दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख प्रभजीत सिंग म्हणाले, “उबर हा ब्रॅंड आता भारताच्या सामाजिक बांधणीचा एक भाग बनला आहे. येथे प्रवासाच्या संकल्पनेत बदल घडवून आणण्यात यश मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. गेल्या दशकात आमच्यामुळे लाखो चालकांना रोजगार मिळाला. भारतातील उत्साही लोकसंख्या आणि सतत विस्तारणारी डिजिटल अर्थव्यवस्था यांचा विचार केल्यास आमच्या कंपनीला भारतात उज्ज्वल भवितव्य आहे. भारताने तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दिशेने सुरू केलेल्या वाटचालीत सहभागी होण्यास व त्याच्या प्रगतीला गती देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

भारतातील काही मोजक्या शहरांपासून सुरुवात करून उबर आता भारतातील १२५ हून अधिक शहरांमध्ये विस्तारलेली आहे. या कंपनीच्या प्लॅटफॉर्ममुळे लाखो लोकांना काही मिनिटांत आपला प्रवास निश्चित करणे शक्य झाले आहे, तसेच ८ लाखांहून अधिक चालकांना नियमित उत्पन्न मिळविण्यात मदत होत आहे. भारतीय प्रवासी व चालक यांच्या विशिष्ट मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनीने अनेक नवकल्पना येथे सादर केल्या आहेत. रोखीने पैसे स्वीकारणे, या उद्योगात प्रथमच सादर होणाऱ्या सुरक्षाविषयक अनेक वैशिष्ट्यांची अंमलबजावणी प्रादेशिक भाषांमध्ये करणे असा अखंड व उत्कृष्ट अनुभव आपल्या वापरकर्त्यांना देण्याचा ‘उबर’ने नेहमीच प्रयत्न केला आहे.

‘उबर’च्या दहा वर्षांच्या काळात ग्राहकांना काही मोलाचे अनुभव आले. ‘उबर’ने त्यांच्या प्रवासात कसे परिवर्तन घडवून आणले, त्याबद्दल ग्राहकांच्या सर्वेक्षणाचे काही मुद्दे पुढीलप्रमाणेः

 

 

●   ९० टक्के ग्राहक म्हणतात, की ‘उबर’ने भारतात प्रवास करण्याच्या पद्धतीत क्रांती केली आहे.

●   ७२ टक्के लोक म्हणतात, की राइडशेअरिंग पर्यायाच्या उपलब्धतेमुळे त्यांनी वैयक्तिक वाहन खरेदी करण्याचा निर्णय मागे घेतला.

●   ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोक म्हणतात की एकापेक्षा जास्त पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवासाची सोय ही ‘उबर’विषयीची त्यांची सर्वात आवडती बाब आहे. आपल्या स्वतःच्या गाडीची देखभाल कमी करावी लागणे किंवा ड्रायव्हरचा पगार द्यावा न लागणे ही बाब दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर प्रवासादरम्यान वेळ मोकळा मिळणे ही तिसरी सर्वात आवडती बाब आहे.

●   ७९ टक्के लोकांनी सांगितले, की ते सायंकाळनंतरच्या मौजमजेच्या कार्यक्रमांची आखणी करताना ‘उबर’वर अवलंबून असतात. प्रसंगी मद्यपान केल्यानंतरही त्यांना ‘उबर’च सोयीची वाटते.

●   जवळपास ५५ टक्के लोक म्हणतात, की शाश्वत उर्जेवर चालणारी प्रवासाची सुविधा ही येत्या दशकात प्रमुख सुविधा बनेल.

Source: Uber/Censuswide, Consumer Trends Survey, India, August 2023, n=1044  online adults, age: 18 to 54+

दहा वर्षांच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर, ‘उबर इंडिया’ने लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱा आणि जनसामान्यांसाठी बदललेल्या या प्रवासी सुविधेची प्रत्येकाला आठवण करून देणारा एक लहान डिजिटल चित्रपट प्रदर्शित केला आहे.

Leave a Reply

%d