fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsSports

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 430 खेळाडू सहभागी

पुणे :  पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत शहरांतून  विविध वयोगटात एकुण 430 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.  पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये 1 ते 5 सप्टेंबर 2023 दरम्यान ही स्पर्धा होत आहे.

पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागु आणि टेबलटेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले की, स्वर्गीय डॉ. प्रमोद मुळ्ये यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत  असून यामध्ये मोहिल ठाकूर, शरण्या प्रधान, श्रेयस माणकेश्वर, नैशा रेवस्कर, शौरेन सोमण,  नील मुळ्ये, आनंदिता लुणावत, प्रणव घोलकर, धनश्री पवार, आदित्य जोरी, धनश्री पवार, संतोष वाक्रडकर हे अव्वल मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.

स्पर्धेत एकुण 1,20,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, ही स्पर्धा 11,13,15,17,17,19 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात, तर खुला पुरुष व महिला गट, प्रौढ गट अशा गटात होणार आहे.  स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना करंडक व पदके अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे लागु यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष तन्मय आगाशे, स्पर्धा संचालक अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर यांचा समावेश आहे. स्पर्धेचे उदघाटन 1 सप्टेंबर रोजी विद्या मुळ्ये यांच्या हस्ते होणार आहे.

गटवार मानांकन असे :
11 वर्षांखालील मुले: 1.मोहिल ठाकूर, 2.धैर्य शहा, 3.टॉम एल्विस, 4.वरदान कोलते, 5.निरव मुळ्ये, 6.सर्वेश जोशी, 7.रणवीर निकम, 8.ऋग्वेद दांडेकर;
11 वर्षांखालील मुली: 1.शरण्या प्रधान, 2.स्पृहा गुजर, 3.अहाना गोडबोले, 4.स्पृहा बोरगावकर;

13 वर्षांखालील मुले: 1.श्रेयस माणकेश्वर, 2.अली कागदी, 3.अनुज फुलसुंदर, 4.अनंत करमपुरी, 5.मोहिल ठाकूर, 6.राजस भावे, 7.आयुष पाटील, 8.दर्शन कांडळकर, 9.अर्णव सरपोतदार;
13 वर्षांखालील मुली: 1.नैशा रेवस्कर , 2.आद्या गवात्रे, 3.दिया शिंदे, 4.मृदुला सुरवसे;

15 वर्षांखालील मुले: 1.शौरेन सोमण, 2.कौस्तुभ गिरगावकर, 3.श्रेयस माणकेश्वर, 4.आदित्य सामंत, 5.सुशील आवटे, 6.इशान खांडेकर, 7.स्वरूप भाडळकर, 8.अश्विन कुमारगुरु;
15 वर्षांखालील मुली: 1.नैशा रेवस्कर, 2.रुचिता दारवटकर, 3.सई कुलकर्णी, 4.तनया अभ्यंकर;

17 वर्षांखालील मुले: 1.नील मुळ्ये, 2.कौस्तुभ गिरगावकर, 3.प्रणव घोळकर, 4.शौरेन सोमण, 5.वेदांग जोशी, 6.अश्विन कुमारगुरु, 7.प्रणव खेडकर, 8.इशान खांडेकर;
17 वर्षांखालील मुली: 1.आनंदिता लुणावत, 2.नैशा रेवस्कर, 3.राधिका सकपाळ, 4.सई कुलकर्णी;

19 वर्षांखालील मुले: 1.प्रणव घोळकर, 2.जय पेंडसे, 3.कौस्तुभ गिरगावकर, 4.आदित्य जोरी, 5.नील मुळ्ये, 6.सिद्धराज नांदुरकर, 7.वेदांग जोशी, 8.प्रणव खेडकर;
19 वर्षांखालील मुली: 1.धनश्री पवार, 2.आनंदिता लुणावत, 3.नभा किरकोळे, 4.सई कुलकर्णी;

पुरुष : 1.आदित्य जोरी, 2.जय पेंडसे, 3.भार्गव चक्रदेव, 4.ओंकार जोग, 5.प्रणव घोळकर, 6.वैभव दहिभाते, 7.नील मुळ्ये, 8.वेदांग जोशी, 9.अक्षय देशपांडे;
महिला : 1.धनश्री पवार, 2.स्वप्नाली नरळे, 3.नैशा रेवस्कर, 4.तितिक्षा पवार, 5.राधिका सपकाळ;

प्रौढ(४०वर्षावरील) गट: 1.संतोष वक्राडकर, 2.दीपक कदम, 3.ओंकार जोग, 4.सुयश कुंटे, 5.विवेक अलवानी, 6.आदित्य गद्रे, 7.दीपेश अभ्यंकर, 8.संतोष मडीकुंट.

Leave a Reply

%d bloggers like this: