Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी ठरले पुणेस्थित वास्तुरचनाकार महेश नामपूरकर

पुणे  : पुण्यातील प्रसिद्ध वास्तूरचनाकार महेश नामपूरकर यांना नुकताच ‘फास्टेस्ट अँड मोस्ट युनिक, अॅस्थेटिक अँड फंक्शनल डिझाईन ऑफ अ गिव्हन स्पेस बाय अॅन इंडिव्हिज्युअल’ (दिलेल्या जागेत गतिमानता, वेगळेपण, सौंदर्यमूल्य अबाधित राखून वस्तुनिष्ठता जपणारे वास्तूरचनाकार) हा सन्मान हॉर्वर्ड वर्ल्ड रेकॉर्डस, लंडन यांच्यातर्फे प्रदान करण्यात आला. नुकतेच हाॅर्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड, लंडनच्या आशिया विभाग प्रमुखांच्या हस्ते नामपूरकर यांना अधिकृत प्रमाणपत्र आणि पदकाने गौरवण्यात आले.

डी वाय पाटील नर्सिंग कॉलेज, कोल्हापूर या वास्तूचे टू द स्केल आर्किटेक्चरल डिझाईन नामपूरकर यांनी अवघ्या २१ मिनिटांमध्ये साकारल्याबद्दल त्यांना या सन्मानाने गौरवण्यात आले. या उपक्रमाचे सर्व निकषांची पूर्तता करणारे डॉक्यूमेंटेशन हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्डला सादर करण्यात आले. हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड टीमने हे डॉक्युमेंटेशन विश्लेषण पूर्वक तपासून त्याचे वेगळेपण मान्य केले.

या निमित्ताने बोलताना नामपूरकर म्हणाले, “मोजक्या वेळेत भारतीय वास्तू रचनाकार व डिझाईनरला टू द स्केल फंक्शनल डिझाईनच्या संकल्पना आणि सादरीकरणासाठी हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड या सन्मानाच्या रूपाने जागतिक ओळख मिळणे, हा मोठ्या समाधानाचा क्षण आहे. वास्तूरचनाकारांसाठी प्रेरणादायी असलेल्या भारतीय कला व संस्कृतीला मी हा सन्मान समर्पित करतो. माझ्या संकल्पना आणि प्रकल्पांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचाच या सन्मानामध्ये वाटा आहे, अशी माझी भावना आहे.”

वास्तूरचनाकार महेश नामपूरकर हे वास्तूरचना, अंतर्गत सजावट आणि लॅंडस्केप डिझाईन या क्षेत्रात सुमारे २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीची दखल अनेक प्रतिष्ठित पुरस्कार व सन्मानांनी घेण्यात आली आहे. ‘मोस्ट क्रिएटिव्ह आर्किटेक्ट ऑफ युरोप अॅंड एशिया २०२२  हा पुरस्कार, हाऊस ऑफ लॉर्ड्,, लंडन येथे सन्मान’, ‘म्युस क्रिएटिव्ह अॅवॉर्ड २०२२ – न्यूयार्क’, ‘७, ए डिझाईन अॅवार्ड २०१९ – इटली’ ही त्यापैकी काही निवडक उदाहरणे आहेत.

हार्वर्ड वर्ल्ड रेकॉॅर्ड्स ही जागतिक स्तरावर कार्यरत असणारी संस्था असून, संस्थेचे मुख्यालये लंडन, भारत आणि दुबई येथे आहेत. संस्थेकडे ख्यातनाम विषयतज्ज्ञ तसेच व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ब्रॅंड अॅम्बॅसिडर्स आणि इन्फ्ल्यूएन्सर्स यांचा चमू आहे. जागतिक पातळीवर सुयोग्य अशा प्रतिभावंतांची निवड करून, त्यांच्या प्रतिभेची सर्वदूर ओळख निर्माण करणे, हे संस्थेचे ध्येय आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading