प्रशांत दामले यांच्या हस्ते अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या वसुंधरा गृहप्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन
कोथरूड, भुसारी कॉलनी येथील न्यू इंडिया शाळेच्या शेजारी सदर प्रकल्प उभारण्यात येणार असून २, २.५ आणि ३ बीएचके अशा एकूण १०० हून अधिक सदनिका या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. विकास अचलकर आणि मनोज तातुस्कर हे प्रकल्पाचे प्रमुख वास्तुविशारद असून सायली वैद्य यांनी या प्रकल्पाचे लँडस्केप डिझायनिंग केले आहे.
मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वसुंधरा या गृहप्रकल्पात अत्याधुनिक सोयीसुविधा घर खरेदीधारकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असून निसर्गाच्या जवळ नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न रांजेकर रिअल्टी यांच्याकडून करण्यात येणार आहे. प्रकल्पामध्ये क्लब हाऊस, अॅम्फीथिएटर, मल्टीपर्पज हॉल, इन्फीनिटी पूल, स्केटिंग रिंक, पार्टी एरिया, झेन गार्डन, लहान मुलांसाठी खेळायची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सिटींग एरिया, मंदिर, ध्यानधारणा करण्यासाठी विशेष जागा, व्यायाम, जॉगिंग पार्क यांबरोबरच वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी कामाची विशेष जागा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.