fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

“उद्धव श्री” पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे – ॲड. गौतम चाबुकस्वार

पिंपरी : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “उद्धवश्री” पुरस्कार समारंभ २०२३” आणि “राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती” योजनेच्या लाभधारकांना धनादेशाचे वाटप गुरुवारी (दि. ३१ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना उपनेते व प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती “उद्धवश्री” पुरस्कार समिती पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी समितीचे सचिव संयोजक गुलाबराव गरुड, कार्याध्यक्ष युवराज कोकाटे, माधव मुळे, संघटक हाजी दस्तगीर मणियार, उपाध्यक्ष हरेश नखाते, अनिता तुतारे, वैभवी घोडके, कल्पना शेटे, खजिनदार तुषार नवले, सह खजिनदार विजय गुप्ता, संघटिका शिल्पा अनपन, सहसचिव स्वप्निल रोकडे, सदस्य प्रशांत तावडे, गोपाळ मोरे, अभिजीत गोफण, अनिल पारचा आदी उपस्थित होते.
या पुरस्कार समारंभास शिवसेनेचे उपनेते व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर, पिंपरी व भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख श्रीनाथ पाटील, महिला संपर्क संघटिका लतिकाताई पाष्टे आधी उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीचा “उद्धव”श्री पुरस्कार २०२३ शैक्षणिक राजीव जगताप, उद्योजक रणजित काकडे, डॉ. राजू शेट्टी, कामगार नेते डॉ. कैलास कदम, अध्यात्म हभप प्रशांत मोरे, वैद्यकीय डॉ. राजेंद्र वाबळे, सामाजिक सेवा तैय्यब शेख, अभिनेत्री माधुरी पवार, आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य विनोद पाटील, वारकरी संप्रदाय पंडित रघुनाथ खंडाळकर, क्रीडाक्षेत्र भारत वाव्हळ, आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बडे, नृत्यकला ऐश्वर्या काळे, क्रीडा मदन कोठुळे, सिने अभिनेते माधव अभ्यंकर, पत्रकार प्रसन्न तरडे, आदर्श कामगार काळूराम लांडगे, सिने बाल कलाकार टिफिन टाईम फेम प्रज्ञा फडतरे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती समितीचे सचिव गुलाबराव गरुड यांनी दिली.
या सोहळ्यास शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक गोविंद घोळवे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, युवा सेना पुणे अधिकारी अनिकेत घुले, माजी नगरसेविका मीनल यादव, भोसरी विभाग प्रमुख धनंजय आल्हाट, चिंचवड विभाग प्रमुख अनंत कोऱ्हाळे, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, माजी नगरसेवक अमित गावडे, तळेगाव शहर प्रमुख शंकर भेगडे, पुणे जिल्हा संघटिका शैला खंडागळे, शहर समन्वयक कैलास नेवासकर, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, माजी नगरसेविका रेखाताई दर्शिले, देहूरोड शहर संघटिका सुनंदा आवळे, उप जिल्हा प्रमुख निलेश मुटके, निवडणूक प्रभारी पिंपरी चिंचवड अशोक वाळके, लोणावळा शहर संघटिका कल्पना आखाडे, प्रणील पालेकर, उप शहर प्रमुख देवराम गावडे, संगणक अभियंता राजन शर्मा, युवा सेना संघटिका प्रतीक्षा घुले, उद्योजक मुकेश फाले आदी प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष युवराज कोकाटे यांनी दिली.

या कार्यक्रमास गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सर्व नागरिकांनी व शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: