fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsSports

नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश 

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत क्वालिफायर 2लढतीत रेव्हन्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, किड्स गटात फिंच व रॉबिन्स यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत क्वालिफायर 2 लढतीत रेव्हन्स संघाने ईगल्स संघाचा 4-3(256-269) असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. रेव्हन्सकडून तेजस चितळे, केदार नाडगोंडे, प्रांजली नाडगोंडे, देवेंद्र राठी , रोहित भालेराव, तन्मय चितळे, गिरीश मुजुमदार, मंदार विंझे यांनी अफलातून कामगिरी केली.
किड्स गटात साखळी फेरीत रोहीन लागु, रियान करंदीकर, निरन भुरट, परम जालान, ऋषभ बेडेकर, रीत जालन, इशान जोशी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर रॉबिन्स संघाने जेज संघाचा 4-1(139-114) असा सहज पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात
फिंच संघाने जेज संघावर 4-1(184-145) असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. फिंच संघाकडून वरद चितळे, अनय इंगळहळीकर, अनुष्का चिरपटूकर, प्रिशा पटवर्धन, विवान ओगले, आनंदी बेडेकर, विवान सोमण, आरव श्रॉफ यांनी सुरेख कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: क्वालिफायर 2: 
रेव्हन्स वि.वि.ईगल्स 4-3(256-269)(गोल्ड खुला दुहेरी 1: बिपिन चोभे/विनित रुकारी पराभुत वि.सुधांशू मेडसीकर/अमित देवधर 07-21, 18-21;
गोल्ड खुला दुहेरी 2: तेजस चितळे/केदार नाडगोंडे वि.वि.सिद्धार्थ साठ्ये/संग्राम पाटील 21-10, 21-12;
खुला दुहेरी 3: अमोल मेहेंदळे/हर्षद जोगाईकर पराभुत वि.जयदीप गोखले/कर्ण मेहता 21-20, 17-21, 12-15 असा पराभूत;
खुला दुहेरी 4: अविनाश दोशी/कुणाल शहा पराभुत वि.चिन्मय चिरपटूकर/संजय परांडे 14-21, 10-21;
मिश्र दुहेरी 5: प्रांजली नाडगोंडे/देवेंद्र राठी वि.वि.बाळ कुलकर्णी/संध्या भट 21-13, 21-18;
खुला दुहेरी 6: रोहित भालेराव/तन्मय चितळे वि.वि.प्रशांत वैद्य/जयदीप कुंटे 15-12, 09-15, 15-14;
खुला दुहेरी 7: गिरीश मुजुमदार/मंदार विंझे वि.वि.संदीप साठे/नीलेश बजाज 04-15, 15-13, 15-07);
किड्स गट: साखळी फेरी:
रॉबिन्स वि.वि.जेज 4-1(139-114)
 (एकेरी खुला दुहेरी 1: रोहीन लागू वि.वि.आर्यन गाडगीळ 15-10, 15-8;
गोल्ड खुला दुहेरी 2: रियान करंदीकर/निरन भुरट वि.वि.आर्यन गाडगीळ/विराज खानविलकर 15-11, 15-12;
खुला दुहेरी 3: हृषिता कुकरेजा/अथर्व रोडे पराभुत वि.चैत्रेय शिरोळकर/प्रिशा पटवर्धन 11-15, 08-15;
खुला दुहेरी 4: परम जालान/ऋषभ बेडेकर वि.वि.अनुष्का चिरपटूकर/शंतनू चिरपटूकर 15-09, 15-10;
मिश्र दुहेरी 5: रीत जालन/इशान जोशी वि.वि.इरा पाटील/सोहम शहा 15-12, 15-12;
फिंच वि.वि.जेज 4-1(184-145)
(एकेरी खुला दुहेरी 1: अनिश घैसास पराभुत वि.चैत्रेय शिरोळकर 15-14, 10-15, 14-15;
गोल्ड खुला दुहेरी 2: वरद चितळे/अनय इंगळहळीकर वि.वि.आर्यन गाडगीळ/विराज खानविलकर 15-10, 15-06;
खुला दुहेरी 3: अनुष्का चिरपटूकर/प्रिशा पटवर्धन वि.वि.आर्यन गाडगीळ/विराज खानविलकर 15-11, 15-09;
खुला दुहेरी 4: विवान ओगले/आनंदी बेडेकर वि.वि.क्रिशय दहिभाते/सोहम शहा 15-07, 14-15, 15-09;
मिश्र दुहेरी 5: विवान सोमण/आरव श्रॉफ वि.वि.इरा पाटील/शंतनू चिरपटूकर 15-14, 10-15, 15-05)

Leave a Reply

%d bloggers like this: