fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

बजाज फायनान्सच्या मुदत ठेवींनी ओलांडला 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा

पुणे: भारतातील आघाडीच्या आणि वैविध्यपूर्ण नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या आणि बजाज फिनसर्व्हचा एक भाग असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडच्या मुदत ठेवींनी आज 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे कंपनीने जाहीर केले.बजाज फायनान्समध्ये सध्या पाच लाख ठेवीदार असून प्रत्येक ठेवीदाराच्या ठेवी 2.87 पट आहेत. कंपनीकडे एकूण ठेवींची संख्या सुमारे 14 लाख आहे.

बजाज फायनान्सच्या दीर्घकालीन कर्ज योजनांसाठी क्रिसील, इक्रा, केअर आणि इंडिया रेटींग या सस्थांकडून ट्रीपल ए स्टेबल म्हणजेच एएए / स्टेबल हा सर्वोत्तम कर्ज पतमापन दर्जा मिळालेला आहे. तर कंपनीच्या अल्प मुदतीच्या कर्ज योजनांसाठी क्रिसील, इक्रा आणि इंडिया रेटींगकडून एवन प्लस तर क्रिसील आणि इक्राकडून मुदत ठेव योजनांसाठी ट्रीपल ए (स्टेबल) हा दर्जा मिळालेला आहे.

बजाज फायनान्सच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन सिक्का म्हणाले, “आकर्षक व्याजदराआधारे आमच्या ग्राहकांना दीर्घकालीन बचत पर्याय सादर करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलेले आहे. गेल्या दोन वर्षात मुदत ठेवींचा पोर्टफोलिओ दुप्पट होऊन त्यात झालेली वेगवान वाढ ही बजाज फिनसर्व्ह या ब्रॅण्डवर ग्राहकांचा असलेला विश्वास, डिजीटल पध्दतीने मुदत ठेवींत गुतवणूक करण्याची सहजसुलभता आणि आमचे देशव्यापी अस्तित्व या साऱ्यांचे प्रतिबिंब आहे. ”

बजाज फायनान्स 44 महिन्यांच्या मुदत ठेवींसाठी सर्वाधिक व्याजदर प्रदान करते. या मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.60 टक्के तर अन्य ग्राहकांसाठी 8.35 टक्के व्याजदर दिला जातो. दहा वर्षात कंपनीच्या एकूण मुदत ठेवीच्या रकमेत वार्षिक 60 टक्के चक्रवाढ झाली असून ठेवीदारांची संख्या वार्षिक 49 टक्के चक्रवाढ दराने झाली आहे. कंपनी सध्या 12 महिन्यांच्या मुदतठेवींसाठी 7.40 टक्के, 24 महिन्यांसाठी 7.55 टक्के व्याजदर देते. तर 36 ते 60 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.05 टक्के व्याजदर दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी या दरांवर अतिरिक्त 0.25 टक्के व्याजदर दिला जातो.

बजाज फायनान्सचे सध्या एकूण सात कोटी 30 लाख ग्राहक आहेत आणि त्यातील चार कोटी 2 लाख ग्राहक अॅपवर सक्रीय आहेत. डिजीटल माध्यमातून मुदत ठेवीत गुंतवणूक करणारे ग्राहक हे विविध वयोगटातील असून त्यांची संख्या लक्षणीय असल्याचे कंपनीला दिसून आले आहे.

Leave a Reply

%d