विद्यापीठाच्या लाचखोर कर्मचाऱ्याला अभाविप ने रंगेहाथ पकडले
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चाललेल्या भोंगळ कारभारात अजून भर पडली. बी ए चे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याकडून ३००० रूपयांची लाच घेताना नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याला अभाविप कार्यकर्त्यांनी आज रंगेहाथ पकडले.
विद्यापीठात बी ए चे शिक्षण घेणारा प्रथम भंडारी, आपली मार्क शीट मागण्या करिता परीक्षा विभागातील “नेवासे” या कर्मचाऱ्याकडे गेला असता, त्याच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली. कर्मचारी ऐकत नसल्याने जाचाला कंटाळून विद्यार्थ्याने ३००० रूपये नेवासे यांना दिले. हा विषय अभाविप समोर आला असता, अभाविप च्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहचून संबंधित लाचखोर कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले.
अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यावेळी बोलले की, “संबंधित घटनेच्या विषयात विद्यापीठ प्रशासनाने अद्याप काही कारवाई केली नाही, परंतु या विषयात विद्यापीठ प्रशासन कडक कारवाई करेल असे कुलगुरूंनी याठिकाणी आश्वस्त केल्याची माहिती सांगितली.तसेच, या विषयात जर विद्यापीठ प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही, तर अभाविप च्या तीव्र आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.