fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक साठी पात्र

नवी दिल्ली  : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरीसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठीही पात्र ठरला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २७ ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये एकूण १२ खेळाडू सहभागी होणार आहेत.

हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. सध्या क्वॉलिफिकेशन राउंड म्हणजेच पात्रता फेरी सुरु आहे. नीरज चोप्रा जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला ॲथलिट ठरला आहे. त्यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: