महिला काँग्रेसच्या वतीने भाजपा नेते विजयकुमार गावीत यांच्याविरुद्ध जोडे मारो आंदोलन
पुणे : महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी कांग्रेस भवनाच्या बाहेर भाजपाचे नेते आमदार विजयकुमार गावित यांच्या विरुद्ध जोडे मारो आंदोलन घेण्यात आले.परवा एका कार्यक्रमात भाजपा आमदार विजयकुमार गावीत यांनी महिलांविरुद्ध अभद्र टिपण्णी केली. ते म्हणाले जर मुली आणि महिलांनी मच्छी खाल्ली त्यांची स्कीन चिकणी होते व त्या चिकण्या दिसतात.आणि मग त्या पटवता येताततसेच अमिताभ बच्चन यांच्या सूनबाई ऐश्वर्या बच्चन राय यांच्यावरही अभद्र टिपण्णी केली.
त्यांच्या मते ऐश्वर्या राय रोज मच्छी खाते म्हणून तिचे डोळे खूप सुंदर आहेत आणि तिही सुंदर दिसते असे त्यांनी सांगितले “मच्छी खा आणि चिकणी दिसा म्हणजे मुली पटविता येतील ” या भाजपा नेत्यांची आयडिया आणि स्लोगन सध्या बदलले आहे बेटी बचाव बेटी पढाव हे स्लोगन बदलून बेटी को मच्छी खिलाव और चिकणी बनाव और फिर पटाव हे नविन स्लोगन तयार झाले आहे.. या नेत्यांच्या घरी आयाबहिणी आहेत का नाही ही शंका येते भाजपानेते सध्या महिला-मुली यांच्यावर सतत अभद्र लज्जास्पद घाणेरडी टिपण्णी करत असतात. कायम महिलांचा अपमान करणे,भाषणामध्ये अश्लील बोलणे हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्यांचे दिल्लीचे नेते यावर काही बोलत नाहीत या मनुसंस्काराच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेस या विजयकुमार गावितला कांग्रेस भवनाच्या बाहेर जोड्याने मारले.तसेच भाजपा विरोधात घोषणाबाजी केली.
माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा संगिता तिवारी, नगरसेविका सुजाता शेट्टी, नानी राजगुरू, रजनी त्रिभुवन, सीमा महाडिक, सुवर्णा माने, रजीया बल्लारी,अनुसुया गायकवाड, सुंदर ओव्हाळ, नंदा ढावरे, रमा भोसले, कांता ढोणे,संतांन पिल्ले,सोनिया ओवाळ, ताई कसबे, गीता तारु ,दिंगाता ओव्हाळ, गौरी काळे महिला उपस्थित होत्या
