Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

हिंदुं वरील अत्याचारावर, आक्रोश करत न बसतां, ‘संसदेस घेराव घालणारे’ काँग्रेस नेते राजीव गांधीच् होते..

पुणे –   हिंदुं ‘कश्मिरी पंडीतांवरील’ अत्याचारावर, आक्रोश करत न बसतां, ‘संसदेस घेराव घालणारे व कश्मिर मध्ये सेना पाठवण्यास भाग पाडणारे’ तत्कालीन काँग्रेस नेते राजीव गांधी होते असे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते व राजीव गांधी स्मारक समिती संस्थापक गोपाळदादा तिवारी यांनी कात्रज ऊद्यान येथे राजीव गांधींच्या प्रतिमेस अभिवादनपर केले..!
ते पुढे म्हणाले की, १९५० ते ८९ काँग्रेस शासीत काळांत, देशातील अल्पसंख्यांक व बहुसंख्यांकांवर जातीय दंगलींच्या माध्यमातुन कधीही अत्याचार झाले नाहीत. मात्र, १९९० मध्ये केंद्रात आलेल्या ‘भाजप पाठींब्यावरील व्ही पी सिंग सरकारने’ जम्मु काश्मिर’मध्ये श्री जगमोहन यांना राज्यपाल म्हणुन पाठवले व काश्मिर मधील निवडुन आलेले ‘काँग्रेस-नॅशनल कॅान्फ’आघाडी सरकार बरखास्त करून ‘राष्ट्रपती राजवट’ लागु केली. मात्र एकहाती सत्ता असतांना देखील ‘भाजप पाठिंब्यावरील’ सरकारला काश्मिर पंडीतांवरील अत्याचार व हल्ले रोखतां आले नाहीत हा भाजपवरील नामुष्कीचा काळा डाग कधीही पुसला जाणार नाही असे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!
या प्रसंगी शहर काँग्रेस अघ्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की गोळ्यांच्या वर्षांवात आपल्या आईचा धारातिर्थि देह समोर असुनही अश्रु ढाळत न बसतां, शहरात उसळलेली दंगल शमवण्यासाठी ते घरा बाहेर पडले. पायलट’चा जॅाब करत असतांना राजकीय नवखेपण कुठेही जाणवु न देतां स्व राजीवजींनी विकासाची कास धरली व मोबाईल – इंटरनेट क्रांती द्वारा आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवली तसेच प्रसंगी श्रीलंके बाबत धाडसी धोरणात्मक निर्णय घेतले. त्याग – योगदानाचा गांधी घराण्याचा वारसा चालवणारे काँग्रेसनेते मा राहुलजी, हे स्वातंत्र्य व लोकशाही वाचवण्यासाठी ‘डरो मत’ चा नारा देत देशभर मार्गक्रमण करीत, द्वेष / तिरस्काराच्या राजकारणाला छेद देत, सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याचे महत कार्य करीत आहेत.
मा आमदार रविंद्र घंगेकर यांनी सांगितले की, स्व राजीव गांधी यांनी देशांत संगणक क्रांती केली त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नांव मोठे केले व त्याच बरोबर वेगळी ओळख निर्माण केली.
या प्रसंगी, सौ कमलताई व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस राजेंद्र शेलार, पीएमपीएमएल कामगार संघटना इंटकचे अघ्यक्ष राजेंद्र खराडे, उद्यान अधिक्षक डॅा राजकुमार जाधव, सुर्यकांत(नाना) मारणे, सुभाषशेठ थोरवे, रामचंद्र(भाऊ )शेडगे, रमेश सोनकांबळे, पै आबा पवार, हरिदास अडसुळ, भोला वांजळे, प्रशांत(मामा) जाधव, आण्णा गोसावी, शिवाजी भोईटे, ॲड राजेंद्र काळेबेरे, ॲड स्वप्नील जगताप, मारुती माने, सुरेश ऊकीरंडे, धनंजय भिलारे, गोरख पळसकर, गणेश गुगळे, गणेश रेड्डी पै शंकर शिर्के, बाळासाहेब प्रताप, विनायक पाटील, विकास दवे, गणेश शिंदे, नरसिंह अंदोली, देवराज इंदुलकर, नरेश आवटे इ पदाधिकारी, कार्यकर्ते व राजीव गांधी स्मारक समिती सदस्य … इ उपस्थित होते.!
सुर्यकांत(नाना) मारणे, सुभाषशेठ थोरवे, रामचंद्र(भाऊ )शेडगे यांनी प्रमुख नेत्यांचे स्वागत केले तर भोला वांजळे यांनी आभार मानले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading