Saturday, May 23, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

तब्बल 10 लाखाची लाच स्वीकारणाऱ्या महापालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला अटक

पुणे : एमबीबीएस प्रवेशासाठी प्रवेश शुल्काव्यतिरिक्त सोळा लाखांची लाचेची मागणी करत दहा लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ ताब्यात घेतले. पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन कार्यालयामध्ये लाचेची रक्कम स्वीकारल्या नंतर डीन डॉ. आशिष बनगीनवार यांना पकडण्यात आले.

तक्रारदार यांच्या मुलाने NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर एमबीबीएसच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या पहिल्या कॅप राऊंड मध्ये पुणे महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे कोट्यामधून निवड झाली होती. तक्रारदार हे प्रवेश प्रक्रियेसाठी डीन डॉ. आशिष बनगिनवार यांना भेटले असता त्यांनी शासनमान्य प्रवेश शुल्क साडेबावीस लाख व्यतिरिक्त प्रवेशासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेच्या मागणी पैकी दहा लाख रुपये त्यांच्या कार्यालयात स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस हवालदार मुकुंद अयाचित, शिपाई भूषण ठाकूर यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. अशाप्रकारे कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी शासकीय कामासाठी शासनमान्य शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा असे आवाहन उपाधीक्षक नितीन जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading