Thursday, May 14, 2026
BusinessLatest News

तनिष्कची प्रस्तुती ‘द ब्राइड्स ऑफ पुणे’

पुणे : भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य तनिष्कचा वेडिंग ज्वेलरी सब-ब्रँड रिवाह बाय तनिष्क सादर करत आहे ‘द ब्राइड्स ऑफ पुणे’. ग्राहकांसोबतचे ब्रँडचे नाते अधिक दृढ व्हावे यासाठी चालवण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये निवड करण्यात आलेल्या ग्राहकांना पुण्यामध्ये तनिष्कचा चेहरा बनण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये कॉरिन्थियन्स क्लब येथे तनिष्कने ‘द ब्राइड्स ऑफ पुणे’च्या महाअंतिम फेरीचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण २६ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. फॅशन शो या समारोहाचे सर्वात प्रमुख आकर्षण होते. ख्यातनाम पूजा वाघ आणि   मनू भोगावकर यांनी जजेस म्हणून जबाबदारी अतिशय उत्तम सांभाळली.

रिवाह बाय तनिष्कमध्ये नववधूच्या दागिन्यांच्या साजाची संपूर्ण श्रेणी अतिशय विचारपूर्वक व कुशल हातांनी घडवली जाते. नववधूच्या दागिन्यांची निगडित समृद्ध, कालातीत परंपरांना अनुरूप असण्याबरोबरीनेच आयुष्यातील सर्वात खास दिवस अविस्मरणीय बनवण्यात जराही कसूर राहू नये याची पुरेपूर काळजी या दागिन्यांच्या बाबतीत घेतली जाते. पहिल्या फेरीमध्ये पारंपरिक कपड्यांवर परिधान करण्यात आलेला नववधूचा साज प्रदर्शित करण्यात आला, दुसऱ्या फेरीमध्ये नववधुंनी वेस्टर्न कपड्यांवर तनिष्कचे अतिशय आकर्षक हाय-व्हॅल्यू स्टडेड कलेक्शन “टेल्स ऑफ मिस्टिक” मधील दागिने घातले होते. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना राजस्थानमधील आश्चर्यचकित करणारी वास्तुकला, महाल, राजवाडे यांनी प्रेरित होऊन घडवण्यात आला आहे. तनिष्कच्या सॉलिटेयर कलेक्शनची लिमिटेड एडिशन देखील यावेळी प्रदर्शित करण्यात आली.

यावेळी नववधूंची उपस्थिती आणि त्यांचा एकंदरीत आनंद व उत्साह तनिष्क ब्रँडचे कौशल्य, वचनबद्धता व ग्राहकांप्रती निष्ठा दर्शवत होता. रॅम्प वॉक आणि विशेष ब्रायडल फोटोशूटच्या फेऱ्यांनंतर ज्युरींनी सर्वोत्कृष्ट पाच स्पर्धकांची निवड करून विजेत्या म्हणून त्यांच्या नावांची घोषणा केली.  यावेळी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांच्या परीक्षणासाठी उद्योगक्षेत्रातील नामवंत  मिलिंद ढेरे यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.

लवकरच ज्यांची लग्ने होणार आहेत अशा आणि लग्न झालेल्या२० ते ४० वर्षे वयोगटातील तरुणी व महिलांना यामध्ये सहभागी होण्यासाठी व रिवाह बाय तनिष्कमधील त्यांच्या पसंतीचे दागिने व लग्नातील कपडे परिधान करून रिवाह ब्राईड बनण्याचा अनुभव घेण्यासाठी ब्रँडतर्फे आमंत्रित करण्यात आले होते.

तनिष्कचे रिजनल बिझनेस मॅनेजर – वेस्ट  धवल मेहता यांनी सांगितले, “तनिष्कमध्ये आम्ही फक्त दागिने विकत नाही तर ग्राहकांसोबत एक खास आणि दृढ नाते जोडले जावे हा आमचा प्रयत्न असतो, किंबहुना हा आमच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. ब्राइड्स ऑफ पुणे हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आमच्या अमूल्य ग्राहकांना अतुलनीय गुणवत्ता प्रदान करण्यासाठी चालवला जात आहे. त्यांच्या जीवन प्रवासात साथसंगत करून, त्यांच्या अनुभवांचा अविभाज्य भाग बनून आम्ही एक सखोल नाते जोडले आहे. आमचा असा ठाम विश्वास आहे की आमचे ग्राहक हेच आमच्या ब्रँडचे सर्वोत्तम ऍडव्होकेट्स आहेत.  त्यामुळे रिवाह ब्राइड्स आमचे सर्वात नवीन ‘टेल्स ऑफ मिस्टिक’ कलेक्शन परिधान करून पुण्यामध्ये तनिष्कचा चेहरा बनणार आहेत ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट आनंद, समाधान, सन्मान मिळवून देण्याची आमची वचनबद्धता या उपक्रमातून दर्शवली जाते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading