‘लोकशाही व संविधान’ हे शब्द न वापरता मोदींनी टिळकांचा केलेला गौरव हा ‘काँग्रेस संस्कृतीचाच गौरव’ …! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : ब्रिटीशांच्या गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी व ‘स्वराज्याच्या – स्वातंत्र्य प्राप्ती’साठी जन्म झालेल्या काँग्रेसचे नेते लोकमान्य टिळक, महात्मा गांघी, सरदार पटेलांचा गौरव करीत पंतप्रधान मोदींनी टिळक पुरस्काराच्या आपल्या भाषणात, लोकशाही व संविधान हे शब्द न वापरता एकप्रकारे ‘काँग्रेस संस्कृतीचाच्’ गौरव केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..!
टिळक पुरस्कार’च्या मोदींच्या भाषणानंतर प्रतिक्रिया देतांना ते पुढे म्हणाले,
सत्तेवर आल्यावर मोदींनी, संसद व संविधान या दोन्हींवर माथा ठेऊन नमस्कार केल्याचे देशाने पाहीले व नंतरचा काळ देखील देशाने अनुभवला..! हतरी देखील ‘देर आये दुरुस्त आये’ भावनेने,
मोदीं नी ‘टीळक पुरस्कारा नंतर आपली जबाबदारी वाढल्याचे’ सांगीतले, या विधानाचे आपण स्वागत करत असल्याचे
काँग्रेस प्रवक्ते यांनी सांगीतले व निवडणुकांना सामोरे जातांना, ‘सत्तेचा उर्वरीत काळ संविधान भिमुख भूमिकेने मोदींनी पार पाडावा’ हीच पुरस्कारा नंतर काँग्रेस मोदीं कडुन अपेक्षा ठेवत असल्याचे सांगितले.
लोकमान्य टिळकांना अपेक्षीत स्वराज्य हे लोकराज्य अर्थात लोकशाही प्रणीत आहे व त्यास संविधानाची बांधिलकी आहे यांचे स्मरण मोदी व त्यांच्या पक्षाने किमान टिळक पुरस्कार स्वीकारल्या नंतर लक्षात ठेवावे.. ही अपेक्षा व्यक्त केली.
तसेच,
“परकीय आक्रमकांची नांवे बदलून भारतीयांची नांवे लावली तर विरोधकांकडुन हंगामा होतो”, हे पंतप्रधानांचे विधान निखालस खोटे व वस्तुस्थितीला धरून नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे, अन्यथा तसा एक ही निर्णय वा घटना मोदीनी दाखवून द्यावी, नाहक विरोधकांवर तोंडसुख घेण्याचे संकुचित राजकारण करू नये, असे आव्हान देखील काँग्रेस ने केले. या उलट स्वतःच्या गुजराथ मधील ‘सरदार पटेल स्टेडीयम’ ला आता ‘नरेंद्र मोदी स्टेडीयम’ नाव ठेवण्याची गरज का भासली(?) व हे कोणत्या राजकीय संस्कृतीत बसते(?) हे देखील मोदी – शहांच्या भाजपने स्पष्ट करावे अशी पुस्ती ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोडली ..!!
