Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

लोकशाही मानसिकता निर्माण होण्याची गरज : प्रा. अविनाश कोल्हे

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने २७ जुलै २०२३ रोजी पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये ‘ पहिली घटनादुरुस्ती(१९५१)’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे मार्गदर्शन केले .हा अभ्यास वर्ग गुरुवार २७ जुलै २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी भवन,कोथरूड येथे पार पडला. हा चौथा ‘संविधान अभ्यासवर्ग ‘ होता.

दुर्गा शुक्रे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. सुदर्शन चखाले यांनी प्रास्ताविक केले. जांबुवंत मनोहर यांनी प्रा. कोल्हे यांचे स्वागत केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ.उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, अरुणा तिवारी, इत्यादी उपस्थित होते.

प्रा.अविनाश कोल्हे म्हणाले, ‘ जगातील ६० घटनांचा तौलनिक अभ्यास करून ही घटना तयार झाली. स्वातंत्र्यानंतर समानतेसाठी हे प्रयत्न होते.

समाजवादी समाजरचनेसाठी खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार पहिल्या घटनादुरुस्तिने सरकारला मिळाला. जमीनदारांच्या जमिनी सरकारला ताब्यात घेता आल्या. मात्र, न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर सरकारला घटनादुरुस्ती करावी लागली. त्यानंतर कोणत्या कारणासाठी घटना दुरुस्ती करावी, आणि किती वेळा करावी, यावर चर्चा सुरू झाली. आणि घटनेचे मूलभूत रचना बदलता येणार नाही, इथपर्यंत हा प्रवास आला आहे.हा लोकशाहीचा आणि प्रगल्भतेचा प्रवास आहे.तो सजगपणे सुरू राहावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.आपल्याकडे लोकशाही आहे पण, लोकशाही मानसिकता निर्माण झाली पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading