विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवणाऱ्या अकॅडमीची समाजात गरज – आमदार भीमराव तापकीर
पुणे: बहुतांश शैक्षणिक संस्थांची पथ खालावत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास घडविण्यासाठी जेठेज् सारख्या अकॅडमी समाजात महत्वपूर्ण भूमिका बजावतात अशी भावना आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केली.
जेठेज् अकॅडमीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारती विद्यापीठ जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव पाटील, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, माजी सैनिक तथा जेठेज् अकॅडमी, धनकवडी, पुण्याचे संचालक दिलीप सुर्यवंशी, प्राध्यापक अशोक पाटील, जेठेज् अकॅडमीचे संचालक प्रा. आनंद जेठे, प्राध्यापिका दिपाली जेठे आदी मान्यवर उपस्थित होते.
तापकीर म्हणाले;”उच्चशिक्षित आनंद जेठे यांनी आपल्या शिक्षणाचा गरीब, होतकरू तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या विचारातून एक दशकांपूर्वी सुरू केलेला छोट्याशा दहा बाय दहाच्या खोलीतून प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांना समृद्ध करत आहे.
या कार्याची दखल घेत प्राध्यापक आनंद जेठे सरांना गेल्या वर्षी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे शिक्षण क्षेत्रातील केलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यपाल पुरस्कार देऊन सन्मानित केले ही त्यांच्या कार्याची मिळालेली पोहचपावती आहे.
वाढत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जेठेज् अकॅडमी सारख्या अकॅडमी नितांत गरज आहे.
जेठेज् अकॅडमी, धनकवडी, पुणे संचालक आनंद जेठे म्हणाले;”महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातील विद्यार्थी जेठेज् अकॅडमी मध्ये शिक्षण घेतात.
परिस्थितीशी संघर्ष करणारा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली आहे.
जात, धर्म, पंथ हे न पाहता आर्थिक निकषांवर सामाजिक दायित्व भावनेतून शिक्षणाची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणार आहोत.
“आयआयटी’ – “जेईई’ , एनडीए विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे.अशी भावना जेठे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले
