fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियाने X95L सिरीजमध्ये चमकदार लाइट्स आणि डीप ब्लॅक्स प्रदान करणाऱ्या सर्वात मोठ्या  BRAVIA XR 4K Mini LED TV ची केली घोषणा 

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज त्यांच्या ब्राव्हिआ एक्सआर  एक्स९५एल मिनी एलईडी (BRAVIA XR X95L Mini LED) या सिरीजमध्ये २१६ सेमी (८५ इंच) आकाराचा संपूर्ण नवीन टीव्ही बाजारात आणला. कॉग्निटीव्ह प्रोसेसर एक्सआर (XR) ने समर्थित असलेल्या या टीव्हीमध्ये उत्कृष्ट अश्या ब्राइटनेससाठी एक्सआर बॅकलाइट मास्टर ड्राइव्ह आहे, जो अत्याधुनिक काळातील मिनी एलईडी बॅकलाइटला अचूकपणे हाताळतो. निर्मात्याला अपेक्षित असलेला खरा हेतु जे अत्यंत योग्यप्रकारे प्रक्षेपित करू शकतील असे अतुलनीय चमकदार लाइट आणि डीप ब्लॅक्स यांची अभूतपूर्व अशी श्रेणीच या नव्याने बाजारात आलेल्या टिव्हीमध्ये आहे.

अत्याधुनिक काळातील कॉग्निटीव्ह प्रोसेसर एक्सआर (XR) तंत्रज्ञानाने समर्थित असलेला हा एक्स९५एल (X95L) टिव्ही पूर्णपणे हरवून टाकणाऱ्या  मनोरंजनाचा अनुभव देतो. एक्सआर बॅकलाइट मास्टर ड्राइव्ह तंत्रज्ञान आणि एक्सआर कॉन्ट्रास्ट बुस्टर असलेल्या ब्राव्हिआ एक्सआर मिनी एलईडीच्या माध्यमातून प्रखर कॉन्ट्रास्ट आणि ब्राइटनेससह अतुलनीय अनुभव मिळतो. नवीनतम एक्सआर ४के अपस्केलिंग, एक्सआर क्लियर इमेज आणि एक्स आर मोशन क्लॅरीटी यांच्या द्वारे नितळ, चमकदार आणि अजिबात धूसर नसलेल्या सुस्पष्ट अशा ४के अॅक्शनचा आनंद देतो.

याशिवाय एक्स- अॅंटी रिफ्लेक्शन (X-Anti Reflection) प्रतिबिंब कमी करते आणि एक्स वाइड अॅंगलटीएम (X-Wide AngleTM) तंत्रज्ञान कोणत्याही बाजूने अगदी खरे व वास्तविक वाटणारे असे चमकदार रंग दाखवते. डॉल्बी व्हिजनटीएम (Dolby Vision™), डॉल्बी अॅटमॉस टीएम  (Dolby Atmos™), आयमॅक्स एन्हान्स्ड (IMAX Enhanced) आणि नेटफ्लिक्स अॅडाप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड (Netflix Adaptive Calibrated Mode) यांच्या माध्यमातून स्टुडिओच्या गुणवत्तेचे मनोरंजन देणारा सिनेमा घरीच बघता येतो.

(BRAVIA X95L) टीव्ही मध्ये ऑटो एचडीआर टोन मॅपिंग आणि ऑटो जॉनर मोडसह प्लेस्टेशन ५ वैशिष्ठ्यांसाठी परिपूर्ण असे एक भलेमोठे गेमिंग मशीन आहे. यामधील मधील गेम मन्यू हे वैशिष्य तुमच्या गेमचा स्टेटस, गेमचे सेटिंग्ज आणि गेमसाठी मदत करणारी आवश्यक अन्य फंक्शन्स हे सर्व एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देते.

हा नवीन ब्राव्हिआ एक्सआर ८५ एक्स९५एल (BRAVIA XR 85 X95L) टेलिव्हिजन Google TV सह एक स्मार्ट वापरकर्ता अनुभव देते जे 700,000+ चित्रपट आणि टीव्ही मालिकांसह 10,000+ अॅप्स आणि गेमद्वारे अंतहीन मनोरंजन देते. हे Apple AirPlay2 आणि HomeKit सह देखील अखंडपणे कार्य करते. ब्राव्हिआ कोअर (BRAVIA CORE) च्या सहाय्याने मागील २४ महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रदर्शित झालेल्या शेकडो चित्रपटांच्या अमर्यादित पर्यायांमधून, अगदी नवीनच रीलीज झालेल्या चित्रपटांमधून आणि क्लासिक ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून कोणतेही १० चित्रपट तुम्ही निवडू शकता. उच्च दर्जाच्या प्यूअर स्ट्रीमTM ८० एमबीपीएस (Pure Stream™ 80mbps) च्या माध्यमातून तुम्ही ४के यूएचडी ब्लु रे सारखे एचडीआर चित्रपट देखील स्ट्रीमिंग करू शकता.

 

किंमत आणि उपलब्धता:

मॉडेल किंमत उपलब्ध होण्याची तारीख
XR-85X95L ५९९,९९० /- च्या पुढे आता उपलब्ध आहेत

हा टीव्ही भारतातील सर्व प्रमुख सोनी केंद्रे, प्रमुख इलेक्ट्रोनिक दुकाने आणि ई कॉमर्स पोर्टल वर उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: