Wednesday, June 10, 2026
Latest NewsSports

आशियाई फुटसाल स्पर्धेसाठी पुण्याच्या निखिलल माळी, शिपू सनीची भारतीय संघाच निवड

पुणे  – फुटबॉलमधील फुटसाल या नव्या प्रारुपातील पहिल्या आशियाई चषक फुटसाल स्पर्धेसाठी पुण्याच्या निखिल माळी आणि शिबू सानी यांनी भारताच्या २२ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
या स्पर्धेसाठी भारताचा ताजिकीस्तान, म्यानमार, पॅलेस्टाईनसह ई गटात समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महरासंघाने या वर्षी फेब्रुवारीत नवी दिल्ली येथे झालेल्या हिरो फुटसाल क्लब अजिंक्यपद स्पर्धेतून ३१ संभाव्य खेळाडूंची निवड केली होती. यामधून अंतिम २२ जणांचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला.
शहरातील दोन खेळाडूंपैकी माळीला सलग दोन वर्षे राष्ट्रीय विजेतेपदाचा अनुभव आहे. माळीने प्रथम दिल्ली एफसीकडून खेळताना २०२२ आणि नंतर मिनेवरा अकादमीकडून खेळताना २०२३ मध्ये विजेतेपद मिळविले होते. या दोन्ही वर्षी माळीची स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. मालीचा जन्म नायजेरियातील असून, त्याचे वडिल तेथे अभियंता म्हणून काम करतात. अंगभूत गुणवत्ता असूनही केवळ घरापासून दूर रहातो म्हणून मालीला प्रथम शाळेच्या (बिशप्स प्रशाला) संघात स्थान मिळाले नव्हते. त्या वेळेस अन्य स्पर्धेत खेळून मालीने आपली गुणवत्ता सिद्ध केली. स्थानिक क्लब परशुरामियन्सने त्याला सर्वात प्रथम करारबद्ध केले. एका हंगामात परशुरामियन्सकडून खेळल्यावर पुढील हंगामासाठी माली ग्रीनबॉक्स चेतक संघात दाखल झाला. त्या वेळी त्याला पीडीएफएच्या अव्वल विभागात खेळण्याची संधी मिळाली.
मालीने पुढे आपल्या महाविद्यालयीन कारकिर्दीत मित्रांसह फाईव्ह साईड स्पर्धेसाठी ‘पन्ना बॉईज’ संघाची स्थापना केली. या संघाने स्थानिक फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा राखताना शंभरहून अधिक स्पर्धा जिंकल्या. या दरम्यान मालीला १८ वर्षांखालील आय-लीग स्पर्धेसाठी डीएसकसे शिवाजीयन्स संघाने करारबद्ध केले. तेव्हापासून माली आय-लीगच्या द्वितीय श्रेणीत खेळत आहे. काली आतापर्यंत दिल्ली एफसी, एफसी बंगळुरू आणि ऐझॉल एफसी संघाकडून खेळला आहे.
सनीला मात्र ही निवड म्हणजे आश्चर्याचा सुधक धक्का आहे. वयाच्या ३४व्या वर्षी त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. सनीने २००७ मध्ये मध्ये फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. पुणे एफसी, डेक्कन इलेव्हन, व्होबा, डीएसके शिवाजीयन्स सीएमएस फाल्कन्स अशा विविध क्लबचे त्याने प्रतिनिधीत्व केले. सनी एअर इंडिया, महिंद्रा युनायटेड, एफसी कॅव्हेलोसिम (गोवा) या व्यावसायिक संघाचेही प्रतिनिधीत्व केले. कोल्हापूरच्या बाळगोपाश आणि अहमदाबादच्या जुगरनॉटस संघाकडूनही सनी खेळला.
सनीच्या कारकिर्दीत जुगरनटस संघाने हिरो फुटसाल स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठली. याच प्रभावी प्रदर्शनामुळे सनीला राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडले. आता तो ताजिकीस्तान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताच्या जर्सीत खेळताना दिसेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading