Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

ऐश्वर्या बोडके, मोनाली नातू यांची आशियाई स्पर्धेसाठी निवड

पुणे : १९ व्या आशियाई स्पर्धेत भारतीय सॉफ्टबॉल संघात पुण्याच्या ऐश्वर्या बोडके व मोनाली नातू यांची निवड झाल्याचे पत्र भारतीय सॉफ्टबॉल संघटनेच्या अध्यक्षा नीताल नारंग यांनी दिले आहे.


ऐश्वर्या बोडके व मोनाली नातू या दोघी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून  गेल्या पाच वर्षांपासून आझम स्पोर्ट्स अकादमीमध्ये सराव करतात. या दोघी ५ ऑगस्ट पासून पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय, चंदीगड येथे भारतीय संघाच्या सराव शिबिरात सहभागी होणार आहेत. २६ ऑगस्ट रोजी चंदीगडवरून स्पर्धेसाठी संघ प्रस्थान करणार आहे.


ऐश्वर्या व मोनाली यांनी नुकत्याच जगन्नाथ पुरी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळेच त्यांची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. ऐश्वर्या हिने गेल्यावर्षी दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
ऐश्वर्या बोडके व मोनाली नातू यांचे राज्य संघटनेचे अध्यक्ष गिरीश महाजन, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शैला बूटवाला, दोघींचे प्रशिक्षक व आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading