Monday, May 4, 2026
ENTERTAINMENTLatest News

अव्दैत नेत्राचा जीव वाचण्यासाठी काय करणार?

झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलेली असताना ३० जुलैच्या महाएपिसोडमध्ये अव्दैत नेत्राचा जीव वाचण्यासाठी काय करणार, हे पहायला मिळणार आहे.

त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलीच्या आयुष्यात विवाहयोग नसतो आणि असलाच तरी तिचं संसारिक आयुष्य खडतर असतं, याचा प्रत्यय सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत नेत्राला येत आहे. पण अजून तिला ग्रंथ न सापडल्यामुळे तिच्या दिव्यशक्तीविषयीच्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. याचा नेत्राने शोध घेणं मात्र थांबवलेलं नाही. नेत्राबरोबरच इंद्राणीही ग्रंथ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती बंटी आणि रूपालीचा पिच्छा पुरवत आहे. एकीकडे हे सर्व घडत असताना मालिकेत आता अव्दैतला लग्नानंतर नेत्राचा मृत्यू अटळ आहे, हे कळणार आहे. त्यामुळे निरागस मनाचा अव्दैत अतिशय हळवा झाला आहे. त्याला वाटतं की लग्नाचं नातं तोडलं तर कदाचित नेत्राचा जीव वाचू शकेल, पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरतो. या दरम्यान राजाध्यक्ष कुटुंबात अशा काही घडामोडी घडतात की अव्दैतला नेत्रापासून दूर राहणं शक्य होत नाही. या दरम्यान नेत्रा लग्नाचं नातं तुटू नये, यासाठी अव्दैतला समजावत राहते. आता अव्दैत नेत्राचा जीव वाचवण्यासाठी काय करणार, जशी नेत्रा आजवर त्याचं रक्षाकवच बनून सतत सावलीसारखी त्याच्यासोबत राहिली तसा अव्दैत नेत्राचं रक्षाकवच होणार का, हे आपल्याला महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

मालिकेचे लवकरच ३०० भाग पूर्ण होणार असून नेत्राला ग्रंथ सापडणं, अव्दैतच्या आजोबांचा भूतकाळ दिसणं तसंच त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या तिसऱ्या स्त्रीचं येणं असे महत्त्वपूर्ण टप्पे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. तसेच अव्दैत-नेत्राला वैवाहिक आयुष्यात अनेक रहस्यमय आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, हे दोघे ती आव्हानं कशी पेलतात, हे पाहणंही तितकंच उत्सुकता वाढवणारं असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading