नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांचा येलो अलर्ट जारी
दिनांक 22 जुलै 2023 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दिनांक 23 ते 26 जुलै 2023 ह्या चार दिवसात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
