Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल प्रवाशांच्या सोयीसाठी ३०० बसशेल्टर्स लवकरच उभारणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून निविदा प्रक्रियेद्वारे लवकरच ३०० बस शेल्टर्स उभारण्यात येणार आहेत. सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी साधे, पुणे पॅटर्न, स्टेनलेस स्टील व बी.आर.टी. बस शेल्टर्स असे एकूण मिळून ११३० आच्छादित बसशेल्टर्स आहेत.
तसेच ज्या ठिकाणी बसशेल्टर्स नाहीत अशा ठिकाणी बी.ओ.टी. तत्वावर बसशेल्टर्स उभारण्याच्या निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असून नव्याने ३०० बसशेल्टर्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading