Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Mansoon Update : पुणे – मुंबई धावणाऱ्या रेल्वे उद्या रद्द

पुणे :  राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, सोबतच याचा परिणाम मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या रोजच्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांवर झाला आहे. पावसामुळे मुंबई-पुणे अप आणि डाऊन मार्गावरच्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

मुंबई आणि पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे ट्रेन रद्द झाल्यामुळे या नोकरदार वर्गाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. रद्द झालेल्या ट्रेनमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी आणि इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

डेक्कन क्वीन- 19 तारखेला मुंबईहून पुण्याला सुटणारी आणि 20 तारखेला पुण्याहून मुंबईला जाणारी

डेक्कन एक्स्प्रेस- 19 तारखेला पुण्याहून मुंबईला येणारी आणि 20 तारखेला मुंबईहून पुण्याला येणारी

सिंहगड एक्स्प्रेस- 19 तारखेला मुंबईहून पुण्याला जाणारी आणि 20 तारखेला पुण्याहून मुंबईला जाणारी

इंटरसिटी एक्स्प्रेस- 19 तारखेला पुण्याहून मुंबईला येणारी आणि 20 तारखेला मुंबईहून पुण्याला येणारी

इंद्रायणी एक्स्प्रेस- 19 तारखेला पुण्याहून मुंबईला येणारी आणि 20 तारखेला मुंबईहून पुण्याला येणारी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading