उद्धव ठाकरे तुम्ही मूग गिळून गप्प बसणार आहात का? – चंद्रशेखर बावनकुळे
- विरोधकांच्या बैठकीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंगळुरूमध्ये विरोधकांच्या बैठकीवर निशाणा साधला. या बैठकीत सहभागी झालेले शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या बैठकीत मूग गिळून गप्प बसणार की, सीमाप्रश्न मांडणार? असा सवाल श्री बावनकुळे यांनी केला असून या बैठकीतही केवळ टोमणे मारणार का? असा उपरोधक प्रश्न विचारला आहे. याबाबतचे ट्विट व सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विरोध करण्याचा “समान किमान कार्यक्रम “घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे. उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे.
भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला” धर्मांतर विरोधी कायदा” नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला.
तुम्ही मूग गिळून गप्प बसले.! कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे.
उद्धवजी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगणारे तुम्ही यावर काही बोलणार आहात की नाही? की, मूग गिळून बसणार? कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा,अशी मागणी विधान परिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमाप्रश्न मांडणार आहात की नाही? भूमिका घेणार आहात की नाही?की, फक्त महाराष्ट्रात “टोमणे” मारणार, हात वर करून भाषणबाजी करणार आहात? की, पुन्हा मूग गिळून बसणार? असाही सवाल केला आहे.
ट्विट मध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा “समान किमान कार्यक्रम “घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या (उद्धव ठाकरे) यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे.
हीच ती वेळ!
उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे.
▪️भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला” धर्मांतर विरोधी कायदा” नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला.
तुम्ही मूग गिळून गप्प बसले.!
▪️कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
तुम्ही गप्प बसले!
▪️ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे.
तुम्ही सहभागी झाले!
▪️उद्धवजी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगणारे तुम्ही यावर काही बोलणार आहात की नाही?
की, मूग गिळून बसणार?
▪️कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा,अशी मागणी विधान परिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमाप्रश्न मांडणार आहात की नाही? भूमिका घेणार आहात की नाही?की, फक्त महाराष्ट्रात “टोमणे” मारणार, हात वर करून भाषणबाजी करणार आहात?
की, पुन्हा मूग गिळून बसणार?
पंतप्रधान मा. श्री @narendramodi जी यांना विरोध करण्याचा "समान किमान कार्यक्रम "घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या @uddhavthackeray यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 18, 2023
हीच ती वेळ!
उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू…
