लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) तर्फे २६३ शालेय मुलींना शिष्यवृत्ती प्रदान.
यावेळी प्रमुख पाहुणे – कुशल हेगडे ( अध्यक्ष कन्नड संघ, पुणे) आणि नीलम अहिर (मुख्याध्यापिका, सीईएस विलू पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल) यांच्या हस्ते या मुलींना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विशेष अतिथी -नरेंद्र पाल सिंग बक्षी (रोटरी क्लब ऑफ पुणेचे ८८ वे अध्यक्ष), एलपीएफच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनावाला, संस्थापक विश्वस्त फिरोज पूनावाला, एलपीएफच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी रोडा मेहता, एलपीएफच्या सीईओ प्रिती खरे, एलपीएफचे कॉर्पोरेट पार्टनर्स, देणगीदार, शाळेचे मुख्याध्यापक, शिष्यवृत्ती निवड समिती सदस्य आणि हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा समारंभ संपन्न झाला.
एलपीएफच्या या शिष्यवृत्ती प्रकल्पांतर्गत, शालेय मुलींना त्यांच्या शालेय शुल्कासाठी आर्थिक मदत केली जाते. आर्थिक मदतीच्याही पलीकडे जात सोबतच या मुलींना लाईफ स्किल ट्रेनिंग, शैक्षणिक समुपदेशन, एक्सपोजर व्हिजट्स आणि करिअरसाठी मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे त्यांना भविष्यात स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनण्यास मदत होते.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रमुख पाहुणे कुशल हेगडे म्हणाले की, “ ७ इयत्तेत शिकणाऱ्या या मुलींना मदतीचा हात देऊन पुढील १० वर्षांहून अधिक काळासाठी ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यांच्या शिक्षणाचे आणि संगोपनाचे महान कार्य एलपीएफची टीम करत आहे, त्यांच्या या महान पुढाकारामुळे भविष्यात या मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील आणि सोबतच समाजाच्या स्वावलंबी, सुसंस्कृत आणि जबाबदार तरुणी बनतील.
यावेळी फिरोज पूनावाला म्हणाले, “टूमारो टूगेदर – एलपीएफ स्कूल प्रोजेक्टसाठी आमच्या हृदयाच्या खूप खास स्थान आहे, गेल्या १३ वर्षांपासून या प्रकल्पाद्वारे आम्ही २,८०० हून अधिक मुलींच्या जीवनात होणारे परिवर्तन पाहिले आहे, एकेकाळी ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या डोळ्यात खास चमक आणि आशेचा किरण घेऊन येथे आलेल्या या लहान मुलींना आज चमकदार कामगिरी करताना, पाहून आम्हाला खरोखरच खुप अभिमान वाटतो.”
