Rain update : महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना 21 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, 21 जुलै पर्यंत वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Gradual enhancement in rainfall activity over Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra during next 4-5 days. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD… भेट द्यI pic.twitter.com/iovEitT1I5
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 17, 2023
