Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

दिव्या दिव्या दीपत्कार .. दिव्याला पाहून नमस्कार

पुणे : आषाढी अमावस्येनिमित्त आज लोकविकास मंडळ संचलित बालविकास संस्कार केंद्रातील 60 चिमुकल्यांनी दीपपूजन करून ‌‘दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार’ अशी प्रार्थना केली.
निमित्त होते साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे दीप पूजन कार्यक्रमाचे. शनिवार पेठेतील नवीन मराठी प्रशालेतील सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेत्री व बालनाट्य निर्मात्या शुभांगी दामले यांची प्रमुख उपस्थिती होती.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या कार्यक्रमास मंडळाचे कार्यकर्ते कुमार अन्वेकर, नरेंद्र व्यास, गंधाली शहा, पुष्पा मांडे, उमेश सपकाळ, सचिन पवार तसेच बालविकास संस्कार केंद्राच्या संचालिका अनुराधा कुलकर्णी, उपाध्यक्ष लीना वरघडे, शिक्षिका वैशाली सप्रे, ज्योती नांद्रेकर, जानकी बोडस, सीमा वाघुलकर, गायत्री कडेकर, गौरी खांबेटे, स्वप्नजा सोमण, अरूणा झोरे, अलका निकम, तन्वी ओव्हाळ यांची उपस्थिती होती.
मुलांना मार्गदर्शन करताना शुभांगी दामले म्हणाल्या, अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी दिवा प्रज्वलीत करणे हे दीप पूजनामागील उद्दिष्ट आहे. जीवनातील शिक्षण, व्यायाम तसेच संस्काराची उपयुक्तता त्यांनी विशद केली.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका पियुष शहा यांनी प्रास्ताविकात सांगितली. पूर्वीच्या काळी घरांमध्ये विजेची सोय नव्हती त्या काळात तेला-तुपाचे दिव्यांमध्येच दैनंदिन व्यवहार चालत असत. आपल्याला मदत करणाऱ्या साधनांचे आभार मानण्याच्या हिंदू संस्कृतीतील या सणाचे महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. शुभांगी दामले यांचा सत्कार पियुष शहा आणि अनुराधा कुलकर्णी यांनी केला.
फाटो ओळ : आषाढी अमावस्येनिमित्त साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आज (दि. 17) बालविकास संस्कार केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बालकांसह दीपपूजन करताना पियुष शहा, शुभांगी दामले, अनुराधा कुलकर्णी व शिक्षक वर्ग.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading