Rain Update : मुंबईत अति मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : सोमवारी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने मुंबईसाठी यलो व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच IMD ने पुढील २४ तासांत मुंबई आणि ठाण्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील २.३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सखल भागात, इमारती, रेल्वे रूळ आणि मोकळ्या नालयांमध्ये पाणी संचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबईचा जुहू बीच पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
17/07: Mumbai next 2,3 days heavy rainfall alerts by IMD🌧🌧.
Watch for inundations in low lying areas, temporary structures, transport road & rail, open drains, trees, and ofcourse your health too.
काळजी घ्या … pic.twitter.com/aO4YotGsli— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 17, 2023
