Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र

पुणे :  हेंकेलचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी कौशल्य विकास शाळेचे  ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे सिएसआर प्रकल्प म्हणून उद्घाटन केले. विशेष विद्यार्थ्यांसाठी (मानसिक अपंग) ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे शाळा सरकारी निधीतून आणि एनजीओ  द्वारे चालवली जाते. मुळात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांना सरकार मदत करत असते पण 18 वर्षानंतर विद्यार्थी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. यासाठी आता शाळेत कौशल्य विकासाचे छोटे उपक्रम सुरू केले आहेत ज्यात हे विद्यार्थी समाजाला विविध सेवा देतील आणि बनवलेल्या वस्तूंची विक्री करतील. हेंकेल अध्यक्षांनी केलेल्या मशिनरींचे उद्घाटन ज्यामध्ये फ्लोरिंग मिल, कापूर मशीन, उदबत्ती मशीन, शिलाई मशीन, कॉटन थ्रेड मशीन, पॅकिंग मशीन, व्हिज्युअल लर्निंगसाठी टीव्ही/लॅपटॉप, वॉशिंग मशीन इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि काही तास काम मिळेल आणि काही पैसे मिळतील. ते लहान उद्योजक देखील असू शकतात. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवले. आम्हाला अभिमान आहे की समाजातील अशा समस्यांसाठी आम्ही सिएसआर द्वारे मदत करू शकलो. या जगातील प्रत्येक मनुष्याने अशा मानसिकदृष्ट्या विकलांग समुदायाला मदत करणे आवश्यक आहे असे सुनील कुमार यांनी सांगितले
सूत्रसंचालन प्राचार्य जोशी यांनी केले, प्रास्ताविक डॉ. प्रसाद खंडगळे यांनी केले. सीएसआर समिती सदस्य भूपेश सिंग, सौ.संध्या केडलया, सौ.कुंजल पारेख, मॅनेजर सचिन सपार, पी.के. वर्मा, शाळेतील शिक्षक, हेंकेल कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading