Monday, May 25, 2026
Latest NewsSports

पॅरिस येथे झालेल्या पॅराऍथलेटिक स्पर्धेत सचिन खिलारेला ‘सुवर्ण’

पुणे : पॅरिस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पॅराऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत आझम स्पोर्ट्स अकादमीच्या सचिन खिलारेने गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले.

पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत सचिनने तब्बल १६.२३ मीटरची गोळाफेक करताना सुवर्ण कामगिरी बजावली. दक्षिण आफ्रिकेच्या एन. कार्विनने दुसरे तर (१५.८५ मीटर), अमेरिकेच्या चिनामो जोशुआने तिसरे (१५.५८ मीटर) स्थान राखले.

बंगळूर येथे झालेल्या राष्ट्राचे स्पर्धेत सचिनने १६.१३ मीटरची गोळाफेक करताना सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळेच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या संधीचे सोने करताना सचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाची कामगिरी केली.

गेल्या चार वर्षांपासून सचिन पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सराव करतो. सचिनने मिळविलेल्या यशासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading