Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

महिलांना न्याय मिळावा यासाठी देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा – अधिवक्ता मोनिका अरोरा

पुणे : महिलांना समान न्याय मिळावा यासाठी देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले.

डीईएस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ॲड. श्रीहरी बोरीकर, डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मंडळाचे सदस्य महेश आठवले, ॲड. अशोक पलांडे, प्रभारी प्राचार्या डॉ. सुनिता आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

अरोरा म्हणाल्या, आपल्या देशात कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. फक्त कौटुंबिक कायद्यात समानता नाही. त्यातही विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक याबाबतचे कायदे वेगवेगळे आहेत. त्यामुळे महिला आणि मुलांमध्ये भेदभाव होतो. तो टाळण्यासाठी समान नागरी कायदा होणे आवश्यक आहे.

अरोरा पुढे म्हणाल्या, आपण सर्व भारतीय म्हणून राज्यघटना स्वीकारली आहे. यात कुठल्याही धर्माचा संबंध येत नाही. राष्ट्राला धर्म नाही. समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि गरिमापूर्ण जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले आहेत.

बोरीकर म्हणाले, देशाच्या विकासासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. समान नागरी कायद्यासाठी प्रत्येकाने आपला सहयोग दिला पाहिजे. भारताच्या सोनेरी भविष्यासाठी आपले उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading