Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सह्याद्री कुणबी संघ च्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

पुणे:सह्याद्री कुणबी संघ – पुणे शहर च्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत १०वी व १२वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी प्रमुख वक्ते श्री. शिवाजी माने सर व शाहीर विकास लांबोरे यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे शाखा अध्यक्ष विराज डाकवे, मनसे उपविभाग अध्यक्ष रमेश उभे आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशिस्ती पत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सह्याद्री कुणबी संघाचे महाराष्ट्र प्रांत पदाधिकारी विलास घडशी, विठ्ठल नाईक, नितीन शिगवण, एकनाथ मांडवकर, अजित शिगवण, प्रविण रामाने, राम घडशी, सतिश भुवड तसेच महिला आघाडीच्या वैष्णवीताई भोज, ज्योती घडशी, वर्षा घडशी, अंकिता शिगवण, विभाग पदाधिकारी सागर धुलप, प्रसाद डोळे, अविनाश शिंदे, संजय सुकम, जगदीश बडंबे, प्रदीप सुकम, दत्ता चिनकटे आणि इतर सह्याद्री सदस्य यांची देखिल या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती होती.

सह्याद्री कुणबी संघाचे पुणे शहर अध्यक्ष सतिश डाकवे यांच्या समवेत पुणे शहर पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन केले असता सुत्रसंचालन राज भागणे आणि संतोष रामाणे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading