कलाकारांच्या न्याय हक्कासाठी सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीकडे घ्यावे- चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी
मुंबई -महाराष्ट्रात परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेतआहे. दरम्यान खातेवाटप अद्याप झालेली नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेला येणाऱ्या खात्यांमध्ये सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीकडे घावे अशी मागणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
अशा प्रकारची मागणी करण्या मागचा हेतू राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष + अजित पवार हे सतत कलावंताच्या पाठीशी खंबीर उभे असतात. दरम्यान असं असलं तरी सुद्धा कलावंताच्या न्याय व हक्कासाठी सांस्कृतिक विभाग आंतिम निर्णय घेत असत.गेल्या सरकारमध्ये सांस्कृतिक खाते हे काँग्रेसच्या वाट्याला आलं होतं आणि त्यावेळी सांस्कृतिक खाते सांभाळणारे मंत्री निष्क्रिय असल्याने अनेकदा अजित दादांनी कलावंतांसाठी मदत करण्याचा प्रयत्न केले असले तरी सुद्धा सांस्कृतिक खाते त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात अपयशी ठरत होते.अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपटा व सांस्कृतिक विभागचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील गेल्या चार वर्षापासून मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा (इंडस्ट्रियल) दर्जा देऊन त्याचं लेबर ऑफिसचे कार्यालय बनवावे आणि त्या ठिकाणी त्याच्या अंतर्गत युनियनचे रजिस्ट्रेशन करून युनियन च्या मार्फत सिने कलाकार व तंत्रज्ञ आणि त्या संदर्भातील सर्व कामगारचे प्रश्न सोडवावे. व सिंगल चित्रपटगृह बाबतीत ज्या काही जाचक अटी शासनाने लावलेल्या आहेत, त्या अटी शिथिल करून नव्याने त्या चित्रपट गृह मालकांना नवीन उद्योग व व्यवसाय चालू करण्याबाबत परवानग्या द्यावेत.
तसेच महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. तसेच स्व. विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक जुन्नर येथील नारायणगाव येथे उभे करण्यात यावे.आणि मुंबई, पुणे येथे कलाकार मोठ्या प्रमाणावर शुटींगसाठी येत असतात, त्यांच्या साठी कलाकार भवन उभे करण्यात यावे ही मागणी असो की लावणीच्या नावाखाली जे विभस्त्र नृत्याचे प्रकार चालू आहेत त्यांच्यावर कुठेतरी कायद्याचा अंकुश राहिला पाहिजेल यासाठी लावणीच्या कार्यक्रमांसाठी सेन्सॉर लवकरात लवकर सुरू करावे.ही बाब व ज्याप्रमाणे तमाशा कलावंतांच्या बॅनर ला व्यावसायिक लेवल वर अनुदान शासनाकडून मिळलं जातं तसं गावोगावी जाऊन यात्रा जत्रा करणारे व्यावसायिक
लावणी सादर करणारे बॅनर रेग्युलर कार्यरत आहेत अशा बॅनर्सला सुद्धा शासनाकडून अनुदान मिळावे.आणि महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलावंतांच्या पेन्शनसाठी 48 हजार रुपयेचा असलेला दाखल्याची अट बदलून ती एक लाख रुपये उत्पन्नाचा दाखला करावी.आणि ITI मार्फत नाट्य, चित्रपट उद्योगास आवश्यक असणारे बॅकस्टेज आर्टिस्ट यांचे प्रशिक्षण सुरु करून त्यांना कुशल कामगार म्हणून मान्यता देण्याबाबत.असो किंवा महाराष्ट्र शासनाकडून वृद्ध कलावंतांना जी पेन्शन मिळते त्या पेन्शनमध्ये वाढ करावे.अश्या मागन्या गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत बाबासाहेब पाटील सतत सांस्कृतिक मंत्रालयाचे चक्कर कापत आहे असा असला तरी अजित दादा सतत या सर्व वागण्यासाठी नेहमीच आगरी असतात त्यात तीळ मात्र शंका नाही मात्र दादांना कलावंतांविषयी असलेल्या प्रेमामुळेच परत आपण सरकारमध्ये सहभागी झाल्या असल्याने यावेळी सुद्धा कलावंतांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनासुद्धा आग्रहाची विनंतीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे
