९ वर्षांत मोदीं ना काँग्रेसचा भ्रष्टाचार का सापडला नाही….? काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा सवाल..!
मुंबई : पंतप्रधान पदाच्या कवचा खाली, मोदींनी निराधार व तथ्यहिन विधाने करून संविधानिक पदाची प्रतिष्ठा खराब करू नये.
गेली नऊ वर्षे सत्तेत असूनही मोदीजींना काँग्रेसचा भ्रष्टाचार का सापडला नाही..? का कोणत्याही भ्रष्टाचारीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही..? असा संतप्त सवाल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केलेल्या कथित भ्रष्टाचारांच्या आरोपांवर उत्तरादाखल केला..
ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराची प्रकरणे मोजून, मापुन व धमकावुन, ED-CBI ची भिती दाखवून B’ for #भ्रष्टाचारी J’ for #जोडणारी P’ for #पार्टी” ही आपली आहे, हे आपणच कृतीने सिध्द केले आहे..! युएनआय ला दिलेल्या मुलाखतीत ते पुढे म्हणाले, की “पंतप्रधान” पदाचे कवचा खाली वाट्टेल ते निराधार व तथ्यहीन आरोप करणे व “देशाच्या मुलभूत समस्या, वाढती महागाई, बेरोजगारी, बुडत चाललेली अर्थव्यवस्था, वाढत्या शेतकरी आत्महत्या, कामगारांवर ओढावणारे संकट व राष्ट्रीय बँकातून होणारी लुट यातून जनतेस सतत दिशाभुल करण्याचे निंदनीय काम पंतप्रधान पदावरील व्यक्तीनी करणे असंवैधानिक व अशोभनीय आहे.
भाजप कडे ‘राजकीय विधाने’ करण्यास विश्वासार्ह नेते नसल्याचेच हे द्योतक आहे..! अन्यथा खोटी विधाने करणाऱ्या (इतर भाजप) नेत्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल हे माहीत असल्यानेच निराधार आरोप’ करण्यात पंतप्रधान पदाचा वापर केला जात असल्याचे ही काँग्रेस प्रवक्ते यांनी सांगितले.
गांधी, नेहरू, पटेल, आझाद, बोस आदी नेत्यांच्या व काँग्रेसच्या भरीव योगदानातुनच ‘स्वतंत्र आणि लोकशाही भारताची’ स्थापना झाली आणि त्यामुळेच ‘स्वातंत्र्योत्तर भारतात’ तुम्ही सत्तेची फळे चाखत आहात. मोदींनी या वास्तवतेकडे ही दुर्लक्ष करू नये..अशी पृष्टी ही त्यांनी जोडली..!
