Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

टाटा पॉवरने ‘कर्तव्य काळ’ निमित्ताने लोणावळ्यामध्ये  केले वृक्षारोपण 

लोणावळा : भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने हरित व पर्यावरणपूरक भविष्य निर्मितीसाठी योगदान देण्याचे प्रयत्न सुरु ठेवत, आपल्या वालवन धरणाच्या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वृक्षारोपण मोहिमेची सुविधा उपलब्ध करवून दिली. महाराष्ट्र शासनाचे वन विभागाचे प्रधान सचिव श्री बी वेणुगोपाल रेड्डी, पीसीसीएफ आणि वन दलाचे प्रमुख श्री. वायएलपी राव यांच्या नेतृत्वाखाली, टाटा पॉवरचे हायड्रोजचे चीफ श्री. प्रभाकर काळे, डब्ल्यूआरईएलचे सीईओ श्री. ए जी पाटील आणि इतर वरिष्ठांच्या उपस्थितीत टाटा अमृतवनमध्ये ४०० पेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली.

निसर्ग संवर्धनाप्रती आपल्या जबाबदारीचे पालन करत टाटा पॉवरने स्वातंत्र्याच्या पुढील २५ वर्षांमध्ये आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या भारताच्या धोरणाला अनुसरून, कर्तव्य काळच्या निमित्ताने या उपक्रमात सहयोग प्रदान केला आहे. (नुकतेच अमृत काळचे नाव कर्तव्य काळ असे ठेवण्यात आले आहे)

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून टाटा पॉवरने वालवनमध्ये एक व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम चालवत आहे. १९७० च्या दशकात सुरु करण्यात आलेल्या माहसीर संवर्धन प्रकल्पाबरोबरीनेच हिरवाईमध्ये वाढ करण्यासाठी व स्थानिक वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी टाटा पॉवरने हा उपक्रम सुरु केला. जमिनीची धूप होण्यापासून रोखणे, जवळपासच्या समुदायांसाठी रोजगार निर्मिती करणे तसेच शैक्षणिक व बौद्धिक उद्देशांसाठी माहिती जमा करणे, डॉक्युमेंटेशन करणे ही या उपक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत. गेल्या वर्षी वनीकरणावर भर देत संपूर्ण पश्चिम घाट भागात दहा लाखांपेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading