सोनी इंडियानेआजूबाजूचा गोंगाट दूर करणारे नवीन WF-C700N ईअरबड्स बाजारात आणले
सोनी इंडियाने आज ध्वनी तंत्रज्ञानातील एक नवीनतम प्रगती मानली जाईल असे डब्ल्यू.एफ-सी ७००एन (WF-C700N) वायरलेस ईयरबड्स बाजारात आणण्याची घोषणा केली. सोनीच्या ऑडिओ लाइनअप मधील या उल्लेखनीय जोडणीमुळे संगीत रसिकांना आता अतुलनीय मोकळीक, अपवादात्मक आराम आणि याआधी कधी ही न मिळालेल्या उत्कृष्ट आवाजाची गुणवत्ता अनुभवता येईल.
यामध्ये आहे तुम्हाला संगीतामध्ये हरवून टाकण्यासाठी गोंगाट काढून टाकणारे तंत्रज्ञान. गोंगाट काढून टाकणे (नॉइज कॅन्सलेशन) आणि भोवतालचा आवाज या दोन्ही मोड मध्ये सहज बदल करता येण्यासाठी सोप्या बटणांनी कामकाज. सोबत घेऊन जाता येईल अशा खिश्याच्या आकाराच्या नेटक्या केससह डब्ल्यू.एफ-सी ७००एन (WF-C700N) अर्गोनॉमिक पृष्ठभागच्या रचनेसह दिवसभर आराम अनुभवा. विश्वासार्ह हॅंड्स फ्री कॉलिंग अनुभव जो पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आहे. एक तास वापरण्यासाठी १० मिनिटांचे जलद चार्जिंगसह १५ तासांपर्यंत बॅटरी चालते. डीएसईई (DSEE) द्वारे गाणी व संगीताच्या कॉम्प्रेस्ड फाइल्सची गुणवत्ता वाढवून उच्च गुणवत्तेच्या आवाजासह स्ट्रीमिंग संगीताचा आनंद घेता येतो. एकापेक्षा जास्त कनेक्शन्समुळे तुम्हाला दोन उपकरणांमध्ये लगेच बदल करता येतो. आयपीएक्स४ (IPX4) पाण्याच्या थेंबांच्या शिडकाव्यापासून सुरक्षित (स्प्लॅश प्रूफ) आणि घामापासून सुरक्षित (स्वेट प्रूफ) ठेवण्याच्या रचनेसह डब्ल्यू.एफ-सी ७००एन (WF-C700N) तुमच्या दैनंदिन वापरासाठी योग्य आहे.
किंमत आणि उपलब्धता: डब्ल्यू.एफ-सी ७००एन (WF-C700N) भारतात सर्व प्रमुख सोनी रीटेल स्टोर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लूसिव्ह), प्रमुख इलेक्ट्रोनिक दुकाने, www.ShopatSC.com पोर्टलवर आणि ई कॉमर्स संकेत स्थळांवर २० जुलै २०२३ पासून उपलब्ध असतील.
मॉडेल | किंमत (भारतीय रुपयांमध्ये) | उपलब्धता तारीख | उपलब्ध रंग |
डब्ल्यू.एफसी ७००एन | ८९९०/- | 15 जुलै २०२३ पासून | काळा, पांढरा, लॅवेंडर आणि सेज ग्रीन |