‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ९१ प्रकरणांची सुनावणी
पोलीस, प्रशासन, विधी सेवा, समुपदेशक असलेल्या तीन पॅनलनी तयार सर्व केसेसचा निपटारा केला. अनेक प्रकरणांमध्ये आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समेट घडवून आणण्यासाठी चर्चा करुन मार्गदर्शन केले. यावेळी पाच कौटुंबिक केसेसच्या प्रकारांमध्ये समेट घडवून आणून पाचही जोडपी पुन्हा सुखाने नांदावीत यासाठी समुदेशन करण्यात आले. या जोडप्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्राप्त 91 केसेस मधील 64 केसेस वैवाहिक, कौटुंबिक होत्या. सामाजिक- 5, मालमत्ता, आर्थिक- 6 व इतर विषयाशी संबंधित 16 केसेस होत्या.
