चिन्ह जाणार नाही जाऊ देणार नाही – शरद पवार
मुंबई : “जर कोणी चिन्ह घेवून जावू, असे म्हणत असेल, तर जोपर्यंत सामान्य माणसाच्या मनात पक्षाची भूमिका आणि राज्यकर्त्यांचे धोरण पोहचत आहे, तो पर्यंत आपल्याकडून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह कोणी काढून घेवू शकत नाही. तसेच चिन्ह जावून देणार नाही.” असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिला.
अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा एक गट राष्ट्रवादी मधून वेगळा होवून शिंदे – फडणवीस सरकारला जावून मिळाला. इतकेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नऊ आमदारांचा तात्काळ शपत विधी ही झाला. त्यानंतर आज आमदारांचे मताधिक्य जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.
लोकशाहीत पक्ष विरोधी गटाने पक्षावर दावा करणे चुकीचे
पुढे बोलताना पवार म्हणाले, मी जेव्हा कॉँग्रेस मधून बाहेर पडलो, तेव्हा मी कॉँग्रेसच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर दावा केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील विरोधी गटाने असा दावा करणे चुकीचे आहे. काल नाशिकमध्ये झालेला प्रकार अतिशय चुकीचा होता. लोकशाहीत आपला विचार मांडणे चुकीचे नाही. पण पक्षाच्या विरोधात जावून पक्षावरच दावा कारण हे चुकीचे आहे.
त्यांच नाणं खणखणीत नाही
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या परवानगी शिवाय विरोधी आमदारांना माझा फोटो वापरू नये असे सांगितले आहे. मात्र तरी देखील, आजच्या बैठकीच्या बॅनरवर सर्वात मोठा फोटो हा माझा आहे. कारण त्यांना माहिती आहे त्यांच नाणं खणखणीत नाही. त्यामुळे जे नाणं वाजेल तेच नाणं आपण घेतलं पाहिजे हे त्यांना कळालयं.
