Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी करून राष्ट्रवादीतील एक गट शिंदे – फडणवीस सरकार सोबत सत्तेत जावून बसला. अन् आता अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरच दावा केला आहे. याबाबतचे पत्र अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात सादर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थोरले पवार विरोधात धाकटे पवार असा वाद रंगणार आहे. 

आज राष्ट्रवादीचे किमान २८ बंडखोर आमदार अजित पवार यांच्यासोबत मंचावर दिसले. त्यामुळे शरद पवार यांच्या पेक्षा अधिक आमदार अजित पवार यांच्या कडे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक पत्र सादर केले आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी आपणच असल्याचा दावा यांच्या कडून करण्यात आला आहे. या पत्रावर राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्या आहेत. शिवाय हे पत्र 30 जुन चे आहे. म्हणजे दुपारच्या शपत विधीच्या आधीचे. त्यामुळे पुढील काळात शिवसेने प्रमाणेच राष्ट्रवादीची अवस्था होईल, असे चित्र दिसत आहे. 

विश्वास न् घेता घेतल्या आमदारांच्या सह्या 

अजित पवार यांनी निवडणूक आयोगात सादर केलेल्या पत्रात 40 आमदारांच्या सह्या आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार यांची देखील या पत्रावर सही आहे. मात्र आता ते शरद पवार यांच्या सोबत आहेत. या सही बद्दल त्यांना विचारले असता “आपल्याला विश्वासात न् घेता व कोणतीही पूर्व कल्पना न् देता, आमदारांच्या सह्या या पत्रावर घेतल्या गेल्या आहेत”, असे अशोक पवार यांनी सांगितले.

शपत विधीला उपस्थित, मात्र आता शरद पवार यांच्या सोबत

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या शपत विधीला राजभवनात उपस्थित होते. मात्र, त्यांना या शपत विधीची कल्पना नव्हती. त्यानंतर लगेचच त्यांनी शरद पवार यांच्या सोबतच आपण असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले. त्यामुळे अजित पवार यांच्या सोबत नक्की आमदार किती आहेत याबद्दलचा आकडा अजून स्पष्टपणे समोर येवू शकलेला नाही.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading