भाजपचे हिंदुत्व मनुवादी, विखारी – शरद पवार
मुंबई : “राष्ट्रवादी मधून एक गट वेगळा झाला. जो म्हणतो, शिवसेने सोबत आम्ही जावू शकतो तर भाजप सोबत का नाही? त्यांना मी सांगू इच्छितो की शिवसेनेचे हिंदुत्व हे आठरा पगड जातींना सोबत घेवून जाणारे आहे. पण भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे विभाजनवादी, मनुवादी आणि विखारी आहे”, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली.
अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा एक गट राष्ट्रवादी मधून वेगळा होवून शिंदे – फडणवीस सरकारला जावून मिळाला. इतकेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नऊ आमदारांचा तात्काळ शपत विधी ही झाला. त्यानंतर आज आमदारांचे मताधिक्य जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, सुमारे 24 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची स्थापना झाली. आतापर्यंत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीने घडवली. आज चित्र बदललं आहे. संकट खूप आहेत. मात्र,आपल्याला आता पुढे जायचे आहे. या आठवड्यात पक्षात बदल करण्यासाठी पक्षाची बैठक आपण ठेवली होती. मात्र त्या आधीच पक्षातील एक गटाने विरोधी भूमिका घेवून वेगळा गट तयार केला. ज्या जनतेने तुम्हाला विधीमंडळात पाठवले. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला जिंकवण्यासाठी काम केले. त्या पक्षाला, सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात न् घेता आमदारांनी वेगळी भूमिका घेणे योग्य नाही. फुटीरगटाने आम्हीच पक्ष आहे, हे सांगून पक्षाचा ताबा घेणे हे लोकशाहीत योग्य नाही.
नागालँड च उदाहरण येथे देणे योग्य नाही, कारण ….
नागालँड, मणीपुर ही सीमेवरील राज्य आहे. याला चीन आणि पाकिस्तानची सीमा लागून आहे. येथे काही हिंसाचार झाला तर, संबंध भारताला त्यांची किंमत मोजावी लागणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय हित लक्षात घेवून नागाल्यांड येथे राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्यांचे उदाहरण येथे लागू होत नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती ही खूप वेगळी आहे. त्यामुळे विरोधी गटाने, हे उदाहरण देवू नये.
