कला परिवाराकडून शाळांना शालेय साहित्याचे वाटप
पुणे : कला परिवार हडपसर ही हडपसर परिसरातील सांस्कृतिक व सामाजिक संस्था आहे. या संस्थेकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात . यावर्षी संस्थेकडून रचना विद्यालय होळकरवाडी व नूतन माध्यमिक विद्यालय वडकी या शाळातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात कला परिवार हडपसरचे अध्यक्ष दिलीप मोरे , सचिव आकाश जाधव, सहसचिव विजय गायकवाड, संचालिका अर्चना नाईक, वंदना वशिष्ठ, नंदकुमार गुरव, अनिल पवार ,जयंत मस्के, कविता पाटील, संजीव रासकर, चेतना जाठवडेकर, रूपाली लाहोटी, क्षमा देशमुख या सर्व सदस्यांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले…
तसेच हेमाताई लाळगे, अंबिका ताई खंडाळे, सचिन कुंभार, गणेश गोंजारे, अजय खंडागळे,नंदू जगताप, शारिक नायब, बळीराम चव्हाण नेताजी माने, समीर पवार,यश भोरे, माधुरी रासकर, नूतन मोरे, जयश्री चव्हाण, सिमरन नाईक, पल्लवी रवळे सुनंदा यादव, विद्या रवळे कीर्ती वायकर, संगीता बाहेती या सदस्यांनी शालेय साहित्यासाठी मदत केली.
या कार्यक्रमासाठी रचना विद्यालय , होळकरवाडीच्या मुख्याध्यापिका रसिका ठुमकर व नूतन माध्यमिक विद्यालय, वडकीच्या मुख्याध्यापिका कल्पना राऊत यांनी सहकार्य केले…
