पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत किंग्ज 64 संघाला विजेतेपद
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत अंतिम फेरीत किंग्ज 64 संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 4.5 – 1.5 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत अभिषेक देशपांडे, अश्विन त्रिमल, आदित्य भट, आदित्य लाखे,निरन भुरट यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर किंग्ज 64 संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 4.5 – 1.5 असा पराभव केला
स्पर्धेतील विजेत्या किंग्ज 64 संघाला करंडक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, रिअल्टी सेव्हनचे संचालक कपिल त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव शिरीष साठे, तुषार नगरकर, सिध्दार्थ भावे, तन्मय आगाशे, अमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
मराठा वॉरियर्स(1.5गुण) पराभुत वि.किंग्ज 64 (4.5गुण)
परम जालन(0.5गुण) बरोबरी वि.रोहित देवल(0.5गुण);
अर्णव कुंटे(0गुण) पराभुत वि.अभिषेक देशपांडे(1गुण);
गौतम गोवीत्रिकर(0गुण) पराभुत वि.अश्विन त्रिमल (1गुण);
आदित्यवर्धन त्रिमल (0गुण) पराभुत वि.आदित्य भट (1गुण);
ईशान तळवळकर(0गुण) पराभुत वि.आदित्य लाखे (1गुण);
नेहा लागु (0गुण) पराभुत वि.निरन भुरट (1गुण);
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट खेळाडू(पुरूष गट): आदित्य लाखे
सर्वोत्कृष्ट खेळाडू(महिला गट): नेहा लागु
सर्वोत्कृष्ट खेळाडू(प्रौढ गट): चारुदत्त साठे
सर्वोत्कृष्ट खेळाडू(कुमार गट): परम जालन.
