महाराष्ट्राच्या राजकारात पुन्हा भूकंप; राष्ट्रवादीचा शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी तात्कालिन शिवसेने सोबत गद्दारी करून भाजप सोबत सरकार स्थापन केले. या घटनेला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीमाना दिला आहे. तसेच शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
दरम्यान, आज अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा अत्राम आदींनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
