Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

दुबई मधील प्रार्थना सभेत दिवंगत एस. पी. हिंदुजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

 

दुबई : हिंदुजा कुटुंबातील दिवंगत एस. पी. हिंदुजा यांना दुबईतील मान्यवर, व्यावसायिक भागीदार, हितचिंतक, धार्मिक आणि सामाजिक नेते उपस्थित असलेल्या प्रार्थना सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हिंदुजा समूहाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करताना त्यांनी सर्वांशी जपलेली बांधिलकी तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक नीतीमत्ता यांचे दर्शन यातून घडले.

सर्व स्तरातील ४०० लोक उपस्थित असलेल्या या स्मृती सभेत यूएईचे टॉलरन्स आणि कोएक्झिस्टन्स मंत्री एच.ई. शेख नाह्यान बिन मुबारक अल नाह्यान यांनी एस. पी. यांच्याबद्दल बोलताना एक तीक्ष्ण कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला उद्योगपती त्याचवेळी नातेसंबंधांचे मोल जाणणारा एक प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती असा उल्लेख केला. जगभरात आणि यूएई मध्ये घट्ट मूळे रोवतानाच एक आंतरराष्ट्रीय व्यवसाय समूह म्हणून हिंदुजा समुहाच्या वाढीस कारणीभूत असलेल्या त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली.

“एसपी यांची आठवण येईल… त्यांची स्मृती एक आशीर्वाद असू दे… आपण सर्वजण त्यांच्या जीवनातून आणि आदर्शांनी प्रेरित होत राहू,” असे ते म्हणाले. “त्यांची विद्वत्ता आणि उदात्तपणा यांचा मी खूप प्रशंसक आहे आणि त्यांनी जे जे काही साध्य केले त्याबद्दल मी नेहमीच भारावून जात आलो आहे,” असेही एच. ई. शेख नाह्यान म्हणाले.

अशोक हिंदुजा आणि प्रकाश हिंदुजा हे हिंदूजा बंधू, कुटुंबातील सदस्य यांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला यूएई मधील विविध व्यावसायिक दिग्गज्जांनी हजेरी लावली होती. लुलू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष युसुफ अली एमए, आयटीएल कॉसमॉसचे समूह अध्यक्ष राम बुक्सानी, रिगल समूहाचे अध्यक्ष वासू श्रॉफ, अल तमिमी अँड कंपनीचे अध्यक्ष एसाम अल तमिमी यांनी यावेळी आपल्या मनोगतातून एसपी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

BAPS यूएई मधील स्वामी ब्रह्मा विहारी, एसपी हिंदुजा यांच्या स्मृती जागवताना म्हणाले: “ते प्रत्येक क्षण भरभरून जगणारे व्यक्ती होते… परोपकार हा त्यांच्या जीवनाचा भाग होता.” अध्यात्मिक नेते, सद्गुरु, स्वामी चिदानंद सरस्वती, साध्वी भगवती सरस्वती यांचे संदेशही यावेळी सांगण्यात आले. सुप्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान, कैलाश खेर आणि अनुप जलोटा यांनी भक्तिगीतांनी एसपी यांना आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading