Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

शूलिनी युनिव्हर्सिटी खासगी भारतीय विद्यापीठांमधील मेलबर्न युनिव्हर्सिटीची पहिली ड्युएल- डिग्री पार्टनर

सोलन – ड्युअल डिग्री भागिदारीअंतर्गत शूलिनी युनिव्हर्सिटी या भारतातील आघाडीच्या खासगी विद्यापीठाने प्रतिष्ठित मेलबर्न युनिव्हर्सिटीशी भागिदारी केली आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. एखाद्या खासगी विद्यापीठाशी ड्युएल डिग्री अभ्यासक्रमासाठी भागिदारी करण्याची ही मेलबर्न युनिव्हर्सिटीची पहिलीच वेळ असून त्यावरून शूलिनी युनिव्हर्सिटीची ख्याती कळून येते.

प्रतिष्ठित टाइम्स हायर एज्युकेशन (टीएचई) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्जनुसार शूलिनी युनिव्हर्सिटी भारतातील पहिल्या क्रमांकाचे खासगी विद्यापीठ आणि देशातील एकंदरीत दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहेतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिव्हर्सिटी देशातील पहिल्या क्रमांकाचे आणि जगभरातील ३४ वे विद्यापीठ आहे. या भागिदारीमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि नाविन्य क्षेत्रात नवा मापदंड तयार झाला आहे.

बॅचलर ऑफ सायन्स अडव्हान्स्ड (ऑनर्स) या ड्युएल डिग्री अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांन जागतिक दर्जाचे शिक्षण पुरवले जाईल आणि खऱ्या अर्थाने जागतिक शिक्षणाच्या अनुभवाची दारे खुले होतील. या महत्त्वाकांक्षी कराराअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना ड्युएल डिग्री अभ्यासक्रमाचे सर्व लाभ मिळतील. पर्यायाने त्यांना देशातील तसेच मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये शास्त्र शाखेच्या पदवीचा अभ्यास करता येईल. या क्रांतीकारी अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षांचा असून शूलिनी युनिव्हर्सिटीमध्ये त्याची सुरुवात होईल व त्यानंतर मेलबर्न येथे २ वर्ष अभ्यास करता येईल. तिसऱ्या व चौथ्या वर्षात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शाखांच्या मेजर्समधून निवड करता येईल. त्यात शेतीशाश्वतता आणि पर्यावरणजैवशास्त्र आणि कम्प्युटर सायन्स यांचा समावेश असेल.

या भागिदारीविषयी उत्सुकता व्यक्त करत शूलिनी युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू प्रोफेसर अतुल खोसला म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याची अनोखी संधी मिळवून देताना आनंद होत आहे. मेलबर्न युनिव्हर्सिटीशी करण्यात आलेल्या सहकार्यातून शूलिनी युनिव्हर्सिटीचा जागतिक दर्जा दिसून येतो. यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना कित्येक संधी नव्याने उपलब्ध होणार आहेत. ’

त्याशिवाय पात्र विद्यार्थ्यांना आणखी एका वर्ष अभ्यास करून मेलबर्न युनिव्हर्सिटीतील मास्टर्स ऑफ सायन्स पदवी मिळवता येईल. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील अभ्यास पूर्ण केल्यानंतर तिथे काम करण्याचे हक्क मिळतील.

युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नच्या कल्चर अँड एंगेजमेंट विभागाचे उपकुलगुरू मायकेल वेस्ली यांनी महत्त्वाकांक्षी भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही भागिदारी मौल्यवान ठरणार असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण पुरवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रोफेसर नेटवर्क उभारण्यासाठी शूलिनी युनिव्हर्सिटीसह काम करताना आम्हाला आनंद होत आहे. यावरून दर्जेदार भारतीय विद्यापीठांशी दीर्घकालीन सहकार्य करण्याची आणि जागतिक स्तरावर अर्धा दशलक्ष माजी विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या आमच्या नेटवर्कमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनाही समाविष्ट करण्याची आमची बांधिलकी दिसून येते.’

या अभ्यासक्रमातून मेलबर्न युनिव्हर्सिटीची कठोर दर्जा राखण्याची परंपरा दिसून येते. त्याशिवाय शूलिनी युनिव्हर्सिटीचे शिक्षक प्रशिक्षणासाठी मेलबर्नला भेट देतील व दोन्ही संस्थांमधे ज्ञानाची देवाणघेवाण होण्यास मदत होईल.

शूलिनी आणि मेलबर्न युनिव्हर्सिटी एकत्रितपणे भारतीय विद्यार्थ्यांना दर्जेदार जागतिक शिक्षण उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे आजच्या इंटरकनेक्टेड जगात उच्च कौशल्ये असलेल्या व्यावसायिकांची नवी पिढी तयार करणे शक्य होईल.

गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीमध्ये ही भागिदारी निश्चित करण्यात आली. यावेळी उपकुलगुरू प्रोफेसर अतुल खोसला यांच्या नेतृत्वाखाली शूलिनी युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी मंडळाने मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या मंडळात विश्वस्त व अडमिशन्स विभागाच्या संचालक अवनी खोसला, डीन, रिसर्च डॉ. सौरभ कुलश्रेष्ठा, सहकारी संचालक डॉ. रोझी धान्ता यांचा समावेश होता, तर मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांमध्ये जागतिक उपकुलगुरू, कल्चर अँड एंगेजमेंट प्रोफेसर मायकेल वेस्ली यांचा समावेश आहे. या मीटिंगमुळे दोन्ही विद्यापीठे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading