दिल्लीसह उत्तर भारतातील चार राज्यात भूकंपाचे धक्के
नवी दिल्ली : आज (दि. 13) मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दिल्ली आणि उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्राथमिक माहितीनुसार दिल्ली , पंजाब, चांदीगड आणि जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गंडोह भालेसा गावाजवळ ५.३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
दिल्लीतील एनसीआर आणि उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपीय-भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेचा हा भूकंप जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडपासून 30 किमी आग्नेयेला आला. भूकंपाचा केंद्रबिंदू पंजाबमधील पठाणकोटच्या उत्तरेस 99 किमी अंतरावर होता. दरम्यान, सध्यातरी कोणत्याही जीवीत हानीची माहिती नाही.
