Monday, August 31, 2026

Day: June 6, 2023

ENTERTAINMENTLatest News

अव्दैत आणि नेत्रा प्रेमरंगात रंगणार…

रूपाली अव्दैतला नेहमीप्रमाणे आपल्या फसव्या मायेच्या जाळ्यात ओढून त्याचं लग्न तिच्या मर्जीने लावायचा प्रयत्न करते. पण अव्दैत नकार देतो. त्याच वेळी शेखर चाणाक्षपणे अव्दैतला रूपालीचं नाव पुढे करून नेत्राशी लग्नाबद्दल विचारतो. अचानकपणे नेत्राचं नाव आल्याने अव्दैत गडबडतो. त्याला वाटतं नेत्रा रक्षाकवच असल्यामुळे लग्नाला होकार देत असेल, परंतु शेखर त्याला सांगतो, की नेत्राचं अव्दैतवर प्रेम आहे. हे ऐकून अव्दैत चकीत होतो. तो याच विचारात हरवलेला असताना एक जादु घडावी तशी एक घटना घडते आणि या घटनेमुळे अव्दैत – नेत्रा कायमचे प्रेमाच्या रंगात रंगून जाणार आहेत, अशी ही कुठली घटना असेल, असं काय घडलं असेल की नेत्रा–अव्दैतला एकत्र यायला एक क्षणही लागला नाही. हे लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत पहायला मिळणार आहे “सातव्या मुलीची सातवी मुलगी” सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.  

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या अटींसह लागू

मुंबई : केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. १४ जुलै, २०२२ च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य

Read More
BusinessLatest News

भारतातील घनकचरा समस्या सोडवणे हे एक सामूहिक आव्हान – गायत्री दिवेचा, प्रमुख- गुड अँड ग्रीन, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट कंपनीज

मुंबई : भारत  आपल्या प्रचंड मोठ्या कचऱ्याच्या समस्येचे ऊर्जा,  अर्थव्यवस्था आणि  सक्षमीकरणाच्या इंजिनमध्ये  रूपांतर करू  शकतो. कल्पना करा की रोजच्या दिवसाला  ७,५०० कचऱ्याच्या गाड्यांची रांग चालत  आहे आणि त्यातून दरवर्षी आपण  वापरलेला५० दशलक्ष टन घनकचरा जमा होत आहे. आपण जे फेकतो ते आपल्या देशभरातली ३,१५० डंपसाइट्सच्या विस्तारणाऱ्या समुद्रात जमा होते. आपल्या भूमीवरचा तो डाग आहे. पण हे थांबलेले नाही. यात भरच पडत आहे. कारण २०३० पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याचा अंदाज असून वार्षिक १६५ दशलक्ष टन कचरा वाढेल. हा कचरा ठेवण्यासाठी आपल्याला अशा लँडफिलची, जमिनीची गरज भासू शकते जी आपल्या स्वप्नांचे अनमोल शहर असलेल्या मुंबईच्या विस्तीर्ण आकाराची असेल. कचऱ्याच्या एक भयंकर शहरामध्येच् रूपांतर होईल. कचर्‍याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार भारतातील केवळ शहरी आणि औद्योगिक सेंद्रिय कचऱ्यामध्येच अंदाजे ५,६९० मेगावॅट ऊर्जा इतकी प्रचंड क्षमता आहे. क्षणभर त्याची कल्पना करा. ही अशी शक्ती आहे जी संपूर्ण वर्षासाठी २,५०० हून अधिक घरांच्या उर्जेची सर्व गरज पूर्ण करू शकते आणि हे सर्व आपण जे टाकून, फेकून दिलेले आहे त्यातून होऊ शकते.परंतु हे फायदे केवळ पर्यावरणीय नाहीत. आपला कचरा ही आर्थिकदृष्ट्या सोन्याची खाणही  बनू शकते. पुनर्वापर उद्योगाद्वारे कचरा व्यवस्थापनाकडे बघण्याचा एक गंभीर, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन दरवर्षी ३०,०००  कोटी रुपयांचा खजिना खुला करू शकतो. कचऱ्याकडे फेकून देण्याची टाकाऊ गोष्ट म्हणून पाहण्यापासून न वापरलेल्या संधींचा साठा म्हणून बघण्याची आणि आपला दृष्टीकोन बदलण्याची हीच वेळ आहे.  आपल्या कचऱ्याचे दायित्व आपण ज्या कचर्‍याशी झगडत आहोत त्याच्या साठत चाललेल्या ढिगाऱ्याबाबत चिंतन केले तर हे स्पष्ट होते की आता आपण सर्वांनी पुढे जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नागरिक, महामंडळे आणि सरकारी घटकांनी एकमेकांच्या साथीने प्रयत्न केले पाहिजेत आणि या समस्येचा निकराने सामना केला पाहिजे. गोदरेजमध्ये, आम्ही स्थानिक नगरपालिका आणि नागरिकांशी सहयोग करून अनेक सामुदायिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केले आहेत. आमचे सर्वांगीण धोरण तीनपदरी आहे – लँडफिल्समधून कचरा वळवणे, एक शाश्वत कचरा व्यवस्थापन व्यवसाय मॉडेल स्थापित करणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव करणे. तंत्रज्ञानाच्या शक्तीचा उपयोग करून आम्ही पालिकेच्या कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी आणली आहे. आता,कंत्राटदार, शहरी स्थानिक संस्था अधिकारी आणि पर्यवेक्षक कचऱ्याच्या उत्पत्तीपासून शेवटपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेऊ शकतात आणि दररोज प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याच्या सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करू शकतात. या स्पष्ट दृष्टीकोनामुळे  जलद समस्या सोडवण्याची खात्री मिळते, नागरिकांना त्यांच्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि पुनर्वापराच्या शक्यतांचे दरवाजे खुले होतात.

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘कस्तुरी’ : हे माझ्यासाठी घरी परत आल्यासारखंच आहे – अशोक फळदेसाई

असं म्हणतात आईनंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते. हे अनोखं नातं म्हणजे बहिण – भावाचं…

Read More
Latest NewsPUNE

भगवा स्वराज्यध्वज…५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा

पुणे : शिवस्वराज्य दिन चिरायू होवो.. शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो… जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या… गगनभेदी

Read More
Latest NewsPUNE

मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण? हा तर पुणेकरांच्या स्वप्नाशी केलेला खेळ – मोहन जोशी

पुणे : पुणेकर आतुरतेने वाट पहात असलेल्या पूर्ण मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे की नाही? या विलंबाला नक्की कोण

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘लस्ट स्टोरीज 2’चा टीझर आऊट; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

ओटीटीवर धुमाकूळ घातलेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी फिल्म सिरीजचा पुढचा भाग ‘लस्ट स्टोरीज 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ते

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Education : केंद्रप्रमुख पदासाठी आता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा 

मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना आता केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी

Read More